Guru Shukra Yuva Avastha: ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांमध्ये वेळोवेळी वेगवेगळी स्तिथी असते. या स्तिथीला अवस्थाच्या रुपात ओळखले जाते. ग्रहांच्या पाच मूलभूत अवस्था आहेत. बाल अवस्था, कुमार अवस्था, युवा अवस्था, वृद्धावस्था, मृत्यू अवस्था. जेव्हा कोणताही ग्रह युवावस्था मध्ये असतो तेव्हा तो शक्तिशाली असतो. त्यामुळे त्याचा अनुकूल परिणाम सर्वत्र दिसून येतो. गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांनी युवावस्था मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्व राशींवर झालेला दिसून येईल. पण अशा काही राशी आहे ज्यांच्यासाठी गुरु शुक्राची ही स्थिती फलदायी ठरू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु शुक्र यांची ही स्थिती खूप फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अनुकूल स्थितीत आहेत. त्यामुळे याकाळात तुमची सर्व कामे यशस्वी होतील. ज्यांचे व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत त्यांना याकाळात चांगला फायदा होऊ शकतो. तसंच मागील गुंतवणूकी मधून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. याकाळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. एकंदरीत गुरु शुक्राच्या कृपेने तुमचे नशीब पालटणार आहे.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा

कर्क राशी

गुरु शुक्र युवा अवस्था मध्ये प्रवेश करतात कर्क राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. गुरु शुक्र यांची ही स्थिती तुमच्या नवव्या घरात असेल, त्यामुळे तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या राशीमध्ये मालव्य राजयोग तसंच हंस राजयोग देखील तयार होत आहेत. याकाळात तुम्ही धार्मिक कार्यास सहभागी व्हाल तसेच तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. याकाळात तुमची सर्व कामे यशस्वी होतील तसंच ज्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे त्यांच्या जीवनात लवकर समृद्धी दिसून येईल.

(हे ही वाचा: येत्या ८ दिवसांत ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने मिळू शकतो बक्कळ पैसा)

धनु राशी

गुरु शुक्र यांची ग्रहस्थिती धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मालव्य राजयोग आणि हंस राजयोग हे दोन शुभ योग देखील तुमच्या राशी तयार होत आहेत. त्यामुळे याकाळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसंच याकाळात तुम्ही एखादा शुभकार्यात सहभागी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल, तुम्हाला यावेळी पदोन्नती आणि पगार वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच तुमचा समाजातील मानसन्मान देखील वाढेल तुम्हाला. याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारू शकते.

(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)