हिंदू नववर्षाला स्वतःचा राजा, मंत्री आणि मंत्रिमंडळ असते. गुढीपाडव्यापासून सुरु झालेल्या नवीन वर्षाचा राजा शनि आणि मंत्री गुरु आहे. दीड हजार वर्षांनंतर हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. हिंदू नववर्ष संवत २०७९ सुरू झाले आहे. त्यामुळे या नवीन वर्षाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. चला जाणून घेऊयात हे वर्ष कोणत्या राशींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो आणि कोणत्या राशींवर शनिदेवांची कृपा राहील.
धनु: हे हिंदू नववर्ष तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण या वर्षाचा राजा शनिदेव आहे आणि २९ एप्रिल रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करताच धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन आणि वेतनवाढ मिळू शकते.
मिथुन: तुमच्यावर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असणार आहे. शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. तुम्हाला शनिच्या अडीचकीपासून मुक्ती मिळेल. तसेच तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील, व्यवसायाचा विस्तार होईल. विद्यार्थ्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील.
Rahu Gochar: मेष राशीत राहु ग्रह १२ एप्रिलपासून दीड वर्षे मांडणार ठाण, ‘या’ राशींना मिळणार फायदा
तूळ: प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील आणि त्यांची आर्थिक बाजू मजबूत होईल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. वाहन व मालमत्तेचे सुख मिळेल. व्यवसायात कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. तसेच शनिदेवाचे संक्रमण होताच अडीचकीपासूनही मुक्ती मिळेल. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. हिंदू नववर्षाचा राजा शनिदेव आहे आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे हिंदू नववर्ष तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.