scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, बुधवार १५ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी.

Today Horoscope
राशीभविष्य २८ मार्च (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 15 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

मेष:-

कौटुंबिक प्रगतीचा विचार कराल. हातातील कामात यश येईल. एखादी नवीन संधी चालून येईल. नवीन मित्र जोडाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका.

वृषभ:-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. दिवस चैनीत घालवाल. निसर्ग सान्निध्यात रमून जाल. घरात कर्तेपणाचा मान मिळेल. तिजोरीत भर पडेल.

मिथुन:-

सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. घरातील लोकांच्यात वेळ घालवाल. आवडी-निवडीबद्दल दक्ष राहाल. घरातील कामात हातभार लावाल. पत्नीची प्रेमळ साथ मिळेल.

कर्क:-

आपल्याच मर्जीने वागणे ठेवाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. तुमच्यातील अरसिकता वाढेल. वादाचा मुद्दा उकरून काढू नका. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी.

सिंह:-

वैचारिक स्थैर्य जपावे. अडचणीवर मात करता येईल. मानसिक उभारी ठेवावी लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. फार विचार करत बसू नका.

कन्या:-

जोडीदाराचे वर्चस्व राहील. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. सामाजिक कामात हातभार लावाल. तुमची सामुदायिक प्रतिष्ठा वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

तूळ:-

घरगुती कलह वाढू देऊ नका. सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. अती अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

वृश्चिक:-

भावंडांना मदत करावी लागेल. मित्रांचे सहकार्य घ्यावे लागेल. नातेवाईक नाराज होऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.

धनू:-

हातातील कामे खोळंबू शकतात. कौटुंबिक अडचण सोडवता येईल. जुगारातून लाभ संभवतो. फसवणुकीपासून सावध राहा. आर्थिक उलाढाली सजगतेने कराव्यात.

मकर:-

कामाचा उत्साह कायम ठेवावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पीत्त विकार बळावू शकतात. कामातील प्रतिकूलता प्रयत्नाने दूर करावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.

कुंभ:-

अघळ-पघळ गप्पा माराल. वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. कामाचा फार ताण घेऊ नये. जबाबदारी उत्तम रित्या पेलाल. घराची स्वच्छता काढाल.

मीन:-

इतरांशी वाद वाढू शकतो. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठांना नाराज करू नका. मनाजोगी खरेदी करता येईल. घराबाहेर वावरतांना सावध राहावे लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 19:02 IST
ताज्या बातम्या