scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, सोमवार ६ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कर्क राशीचे व्यक्ती आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

Today Horoscope
राशीभविष्य २८ मार्च (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 6 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

मेष:-

तुमचे व्यक्तिमत्व उठावदार ठरेल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. करमणुकीचे कार्यक्रम ठरवाल. हौसेला अधिक महत्व द्याल.

वृषभ:-

मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसतांना कराव्या लागतील. पत्नीची उत्तम साथ मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जपून राहावे. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.

मिथुन:-

इतरांना सहृदयतेने मदत कराल. नवीन लोकांशी मैत्री कराल. स्त्रियांच्या ओळखीने कामे पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. तुमची समाजप्रियता वाढेल.

कर्क:-

औद्योगिक वातावरण चांगले राहील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. आवडीचे खाद्यपदार्थ खाल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीच्या वस्तूंची आवड दर्शवाल.

सिंह:-

परोपकारी वृत्तीने मदत कराल. वाचनाची आवड जोपासाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक अडचण दूर होईल.

कन्या:-

काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील. रेस,सट्टा यातून धनलाभ संभवतो. सासुरवाडीचे लोक भेटतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.

तूळ:-

जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. भागीदाराशी एकोपा वाढवावा. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्य वाढेल. एकमेकांशी समजूतदारपणे वागाल.

वृश्चिक:-

कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात. उधार-उसनवारीचे व्यवहार करू नयेत. आपल्या कडून कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. दूरगामी विचारांना चालना द्यावी.

धनू:-

डावपेच आखूनच वाटचाल कराल. प्रलोभनाला बळी पडू नका. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. बोलतांना आवेग आवरता घ्यावा. दिखाऊपणाला भुलून जाऊ नका.

मकर:-

कामात अधिक जोम येईल. सुप्त कलागुणांना वाव द्यावा. प्रतिष्ठितांच्या भेटीचा योग येईल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी केल्या जातील. कुलदेवतेची आराधना करावी.

कुंभ:-

सामुदायिक वादात अडकू नका. पारमार्थिक बळ वाढवाल. गप्पिष्ट लोकांच्यात वेळ घालवाल. आपले मत उत्तम प्रकारे मांडाल. घरातनातेवाईक गोळा होतील.

मीन:-

मुलांच्या हट्टाला बळी पडाल. मानसिक ताण वाढू शकतो. कामात गतीमानता येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. मानसिक चंचलतेवर मात करावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 19:02 IST
ताज्या बातम्या