Today Rashi Bhavishya, 07 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष (Aries Horoscope Today ):-
राजकीय भूमिकेला यश येईल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अतिघाई चांगली नाही.
वृषभ (Taurus Horoscope Today ):-
सामाजिक भान राखावे लागेल. तरुण वर्गाला आशादायक संधी मिळतील. मित्रांच्या सहवासात रमून जाल. भावंडांचे अधिक प्रेम मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन (Gemini Horoscope Today ):-
मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील. प्रत्येक गोष्टीत गोडी वाटेल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.
कर्क (Cancer Horoscope Today ):-
मानसिक चंचलता जाणवेल. बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.
सिंह (Leo Horoscope Today ):-
मनोवांच्छित लाभेल. नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
कन्या (Virgo Horoscope Today ):-
तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल. काही नवीन ओळखी होतील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते.
तूळ (Libra Horoscope Today ):-
नवीन कामात गढून जाल. अधिकारी लोकांशी भेटता येईल. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. कमिशनमधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-
उगाच टोकाची भूमिका घेऊ नका. वाढीव मेहनत करावी लागू शकते. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.
धनू (Sagittarius Horoscope Today ):-
अचानक धनलाभ संभवतो. काही कामे कमी कष्टात पार पडतील. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात.
मकर (Capricorn Horoscope Today ):-
प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखकारक राहील. कामात सुलभता येईल. शेजार्यांचा त्रास होण्याची शक्यता.
कुंभ (Aquarius Horoscope Today ):-
मौजमजा कराल. स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल. नवीन कामात उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील.
मीन (Pisces Horoscope Today ):-
सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. महत्वाकांक्षी योजना आमलात आणाव्यात. परिश्रमाची कास सोडू नये.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर