आजचं राशीभविष्य, रविवार, ११ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. नातेवाईकांशी संयमाने वागावे.

Horoscope Today Daily Horoscope Rashi Bhavishya in Marathi
सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. काही प्रमाणात मानसिक तणाव राहील. अतिविचारांच्या आहारी जाऊ नये. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अतिविचार करू नका. घरगुती कामात अधिक वेळ जाईल.

वृषभ:-

कला क्षेत्रात संधी मिळू शकेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. बाहेर वावरतांना सावध राहावे. मैत्रीचे संबंध जपावे लागतील. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल.

मिथुन:-

कामाच्या व्यापाने थकून जाल. मनात विचारांचा गोंधळ माजेल. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रकृतीच्या बाबत चिकित्सक राहाल.

कर्क:-

वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. मानसिक स्थैर्य जपावे लागेल. लहान-सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. वैचारिक थकवा जाणवेल.

सिंह:-

कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे. वात विकारांचा त्रास जाणवेल. मानसिक चंचलता राहील. ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

कन्या:-

मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल. कमिशनचा चांगला लाभ मिळेल.

तूळ:-

वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. तरच काही गोष्टी साध्य करता येतील. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल.

वृश्चिक:-

सकारात्मक विचाराने वागावे. व त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. अतिसाहस करायला जाऊ नका.

धनू:-

कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील वातावरण तप्त राहील. मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकता. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. हाताखालील लोक सहकार्य करतील.

मकर:-

एकमेकातील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. मनातील एखादी जुनी आशा पूर्ण होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. तुमची चिकाटी आज उपयोगी पडेल. उत्साहाने कामे हाती घ्यावीत.

कुंभ:-

संयमाने वागावे. आततायीपणे केलेले काम त्रासाला कारणीभूत ठरेल. जोडीदाराच्या मताशी भिन्नता निर्माण होईल. फार तिखट पदार्थ खाणे टाळावे. अनाठायी खर्च होऊ शकतात.

मीन:-

क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. नातेवाईकांशी संयमाने वागावे. धाडसी निर्णय सारासार विचार करून घ्यावेत. हातातील कलेला वाव द्यावा. करमणुकीच्या गोष्टीत मन रमवा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 11 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr