आजचं राशीभविष्य, गुरुवार, १६ जून २०२२ | Horoscope Today 16 June 2022 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi msr 87 | Loksatta

आजचं राशीभविष्य, गुरुवार, १६ जून २०२२

आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल.

आजचं राशीभविष्य, गुरुवार, १६ जून २०२२
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सकस आहार घ्यावा. सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

वृषभ:-

घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तमरित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.

मिथुन:-

आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

कर्क:-

व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो. अती आवश्यक असेल तरच प्रवास करावा.

सिंह:-

दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

कन्या:-

मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे.

तूळ:-

दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

वृश्चिक:-

क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल. योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील.

धनू:-

कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. दुचाकी वाहन चालवताना सतर्क रहा. मनातील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा.

मकर:-

अचानक धनलाभाची शक्यता. मनात नसत्या शंका आणू नका. भावंडांशी खटके उडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणातील गोडी वाढेल. आरोग्यात काहीशी सुधारणा दिसून येईल.

कुंभ:-

नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीतून चांगली कमाई करता येईल. बोलतांना संयम बाळगा.

मीन:-

कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सहकार्‍याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता. कलेचा मनमुराद आनंद लुटता येईल. छंद जोपासायला वेळ काढा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी योग तयार होतोय, या ३ राशींना धनलाभ होण्याची दाट शक्यता

संबंधित बातम्या

‘त्रिग्रही राज योग’ बनल्याने ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार? २०२३ घेऊन येईल प्रचंड धनलाभाची संधी
१६ डिसेंबला ग्रहांचा राजा सुर्यामध्ये होणार सर्वात मोठा बदल; ‘या’ ३ राशींना २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
३१ डिसेंबरपासून ‘या’ ५ राशींचे सुरू होतील वाईट दिवस? तुमच्याही राशीचा समावेश आहे का यात?
तब्बल ३० वर्षानंतर शनिदेवाचा स्वतःच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ ३ राशीच्या लोकांना अमाप पैसा मिळण्याची संधी
२०२३ मध्ये ‘या’ ३ राशींचे नशीब बदलणार? केतूच्या आशीर्वादाने होईल प्रचंड धनलाभ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुरतमध्ये रोड शोवरील दगडफेकीनंतर केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “२७ वर्षे काम केलं…”
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह पतीच सापळ्यात अडकला; औरंगाबाद येथील पथकाची कारवाई
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी