मेष:-

झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू  शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ

वृषभ:-

स्वत:चा फायदा  काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल.

मिथुन:-

मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

कर्क:-

कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

सिंह:-

कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल.

कन्या:-

वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात. चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल.

तूळ:-

कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. हातापायास किरकोळ इजा संभवते. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील.

वृश्चिक:-

स्वत:चेच मत खरे कराल. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

धनू:-

नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. स्वत:मध्ये काही बदल कराल. प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. अडथळ्यातून  मार्ग काढावा. उगाच चीड-चीड करू नये.

मकर:-

मनातील आकांक्षा पूर्ण होईल. त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते.

कुंभ:-

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे.

मीन:-

कामाचा आवाका लक्षात घ्यावा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. लपवाछपवीचे व्यवहार करू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर