मेष:-

मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

वृषभ:-

कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

मिथुन:-

मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल.

कर्क:-

कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक ताण ध्यानधारणा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार हट्टीपणा करू नका.

सिंह:-

मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात.

कन्या:-

हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका.

तूळ:-

क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल.

वृश्चिक:-

घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची मदत घेता येईल. काही बदल समजून घेऊन वागावे.

धनू:-

वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. अधिकाराचा गैरवापर टाळावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

मकर:-

धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. लहरीपणाने वागू नका.

कुंभ:-

आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. संयम सोडून चालणार नाही. सारासार विचारावर भर द्यावा.

मीन:-

सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका.  कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. कर्ज प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात काळजी घ्यावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर