मेष:-

विद्यार्थ्यांना चांगला काळ. महिला वर्ग खुश राहील. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते. जोडीदाराची कृती खटकू शकते.

वृषभ:-

योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. गुंतवणूक लाभदायक ठरेल. योग्य मूल्यमापन करावे. अति अपेक्षा ठेऊ नका.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?

मिथुन:-

मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. आर्थिक बाजू बळकट करावी. एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात.

कर्क:-

देणी-घेणी मिटतील. दिवस आळसात जाईल. अतिविचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी. हट्टीपणा सोडावा लागेल.

सिंह:-

छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.

कन्या:-

तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. कशाचाही गैरफायदा घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

तूळ:-

प्रबळ इच्छेवर कामे होतील. उधार-उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा.

वृश्चिक:-

कायदेशीर सल्ला घ्यावा. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या. मुलांचा विचार समजून घ्या. प्रलंबित येणी मिळू शकतील.

धनू:-

मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका. परिस्थितीत सुधारणा होईल. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा.

मकर:-

प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी. बौद्धिक क्षमता वाढीस लावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळचा प्रवास पुढे ढकलावा.

कुंभ:-

जुने वाद उकरून काढू नका. मैत्रीत वादाची शक्यता. पूर्व नियोजित कामे करावीत. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

मीन:-

घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका. आततायीपणे कृती करू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर