आजचं राशीभविष्य, रविवार ३ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तीना कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल. व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल. व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील. मात्र कोणतेही मोठे निर्णय तूर्तास घेऊ नयेत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. सामाजिक गोष्टींचे भान राखावे.

वृषभ:-

उगाचच शब्दांचा अति वापर करू नका. संयम टिकवून ठेवावा लागेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

मिथुन:-

अघळ-पघळ बोलणे टाळावे. मुद्यांपासून दूर जाऊ नका. गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही. कामाचा ताण जाणवेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

कर्क:-

नियम व अटींचे पालन करावे. व्यावसायिक अनुकूलता मिळेल. इतरांचा विचार आधी करावा लागेल. हातातील कामात यश येईल. प्रवासात सतर्क राहावे लागेल.

सिंह:-

तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. अनुकूलतेसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. अतिविचार करण्यात वेळ वाया जाईल. नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे.

कन्या:-

रहाणीमान सुधारण्यास वाव आहे. भागीदारीत चांगला लाभ होईल. अपेक्षित लाभणे खुश व्हाल. पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल. उगाच गैरसमजाला खतपाणी घालू नका.

तूळ:-

हातातील कामांना गती येईल. कमतरता भरून निघण्यास सुरुवात होईल. नसते साहस करताना सारासार विचार करावा. पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका. स्वत:चे खरे करायला जाल.

वृश्चिक:-

नवीन प्रश्न मार्गी लावाल. आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल. आव्हाने पेलायला बळ मिळेल. कामातून इच्छित ध्येय साध्य करता येईल. मनातील शंका-कुशंका संपतील.

धनू:-

प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. वरिष्ठांशी तेढ वाढवू नका. प्रामाणिक मार्ग स्वीकारा. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा.

मकर:-

नवीन जोमाने कामे करा. कामाची थोडीफार धांदल राहील. भावंडांशी मतभेद वाढवू नका. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेटीचा योग येईल.

कुंभ:-

कामाचा आवाका लक्षात घ्यावा लागेल. योग्य नियोजनावर भर द्यावा लागेल. नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक बाबी शांततेने हाताळाव्यात. काही अनपेक्षित जबाबदार्‍या येऊ शकतात.

मीन:-

तांत्रिक बाबी जाणून घ्याव्या लागतील. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. लहान-सहान गोष्टी मनावर घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 3 july 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

Next Story
Vinayak Chaturthi 2022: यंदा विनायक चतुर्थीच्या दिवशी बनतोय खास योग, अशा प्रकारे गणपतीला प्रसन्न करा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी