Numerology Predictions October 2022: ज्योतिष अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे तुमची जन्मतारीख व नावाचं पहिलं अक्षर. कुंडली बनवायची असो किंवा भविष्याचे अंदाज बांधायचे असो तुम्हाला सर्वात आधी तुमची जन्मतारीख विचारली जाते. ज्या तारखेला व्यक्तीचा जन्म झाला आहे त्या दिवशी असणारी ग्रहांची स्थिती त्याच्या नशिबावर प्रभाव टाकते असा यामागील अंदाज आहे. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून अनेकदा स्वभाव गुण अभ्यासले जातात. त्यामुळे हे दोन घटक सर्वात जास्त महत्त्वाचे ठरतात. आज आपण ऑक्टोबर २०२२ मध्ये तुमच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय याचा अंदाज घेणार आहोत. चला तर मग सुरु करूयात..

जन्मतारीख: १ ते १० (तुमचे नाव A, I, J, K आणि Y पासून सुरू होत असल्यास)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर हा महिना करिअरच्या दृष्टीने खूप यशस्वी राहील असे संकेत आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना उत्तम नेटवर्क लाभेल आणि त्यांना इच्छित नोकरी मिळेल अशी शक्यता आहे. नवीन उद्योग सुरु करायचा असल्यास हा कालावधी शुभ ठरू शकतो. सरकारी योजनांमुळे आर्थिक लाभ होईल. आर्थिक सुखासाठी कर्ज घेणे टाळा. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल असे संकेत आहेत. तुमच्या नात्यातही यंदा सुखाचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. तुम्ही जोडीदाराला समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करणे आवश्यक असेल.

जन्मतारीख: ११ ते २० (तुमचे नाव B, V, O, P आणि R पासून सुरू होत असल्यास)

उद्योजकांना भरघोस नफा, कर्मचार्‍यांसाठी पदोन्नती आणि पगारवाढ, व्यावसायिकांना त्यांच्या कामासाठी भरपूर कौतुक अशा अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा हा महिना ठरू शकतो. स्थावर मालमत्तेचे व्यवहार फायद्यात आणू शकतात. अनपेक्षित स्त्रोतांकडून मिळणारा नफा कर्ज कमी करण्यास मदतीचा हात ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मात्र स्नायू दुखणे व झोपेशी संबंधित आजार होण्याचे संकेत आहेत. नात्यांमध्ये पुढची पायरी गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावे.

Vastu Shastra: पती पत्नीने एका ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी महाभारतात दिलेलं उत्तर पाहा

जन्मतारीख: २१ ते ३० (तुमचे नाव C, G, L ,N आणि S पासून सुरू होत असल्यास)

आर्थिकदृष्ट्या, पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल असा योग्य आहे. न्यायालयीन कामकाजात निकाल तुमच्या बाजूने लागू शकतात. सरकारी धोरणांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते मात्र त्याआधी थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. दुसरीकडे, जोडप्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील अशीही चिन्हे आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना आपल्याला फायदेशीर ठरू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)