ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या नंतर सर्वात मंद गतीने जाणारे ग्रह राहू आणि केतू आहेत. हे दोन्ही ग्रह दीड वर्षाने राशी बदलतात. याशिवाय त्यांची आणखी एक खासियत आहे की ते नेहमी वक्र चालतात. एप्रिल महिन्यात राहू ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. राहू-केतू यांना छाया ग्रह म्हणतात आणि त्यांच्या वाईट प्रभावामुळे अनेक अडचणी येतात, परंतु ते शुभ परिणाम देखील देतात. या काळातील राहू संक्रमण ३ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या राशींवर जवळपास वर्षभर राहूची कृपादृष्टी राहणार आहे. जाणून घेऊया या राशींबद्दल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथुन :

राहुचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. हा काळ त्यांना करिअर आणि आर्थिक स्थितीत मोठी चालना देईल. त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील. विशेषत: जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांनाही मोठे पद मिळू शकते.

खूपच आकर्षक असतात ‘या’ राशीची मुलं; पहिल्या भेटीतच लोकं होतात प्रभावित

कर्क :

राहूचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी कामाच्या दृष्टीने अतिशय शुभ सिद्ध होईल. जे नोकरीत आहेत, त्यांना मोठे पद मिळू शकते. नवीन नोकरी किंवा पदोन्नती मिळू शकते. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही नवीन घर किंवा कार खरेदी करू शकता.

मीन :

मीन राशीच्या लोकांनाही राहूचे संक्रमण लाभदायक ठरेल. तसेच लांबचा प्रवासही करण्याची शक्यता आहे. या लोकांची कामात प्रगती होईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. ज्यांना राजकारणात उतरायचे आहे किंवा मोठे पद मिळवायचे आहे, त्यांची ही इच्छा पूर्ण होईल. एकंदरीत, हा काळ त्यांना प्रत्येक बाबतीत खूप फायदा देईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of this zodiac sign will be blessed by rahu throughout the year social prestige comes along with financial gain pvp
First published on: 06-05-2022 at 15:34 IST