ज्योतिष शास्त्रांतर्गत पाम स्टडी, स्वप्न ज्योतिष, जन्मकुंडली अभ्यास, सामुद्रिक शास्त्र अशा अनेक विद्या प्रचलित आहेत. सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या आणि अवयवांच्या रचनेच्या आधारे त्याचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते. मानवी शरीरावर कुठेतरी तीळ नक्कीच असतात. हे तीळ आयुष्याबद्दल बरेच काही सांगतात. येथे आपण शरीरावर असलेल्या शुभ तीळांबद्दल जाणून घेणार आहोत.

या शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो तो खूप भाग्यवान मानला जातो. असं, म्हणतात की अशा लोकांना ते ज्या क्षेत्रात प्रयत्न करतात तिथे यश मिळते.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
parents stand when it comes to selecting modelling career for their children
चौकट मोडताना : कचाकड्याचे जग
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

ज्या व्यक्तीच्या कपाळावर उजव्या किंवा डाव्या बाजूला तीळ असते, असे लोक आपल्या आयुष्यात खूप पैसा कमावतात, परंतु ते ऐशोआरामावर सगळा पैसा खर्च करतात. त्यामुळे त्यांना अनेकवेळा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

ज्या व्यक्तीच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळचे चिन्ह असते, असे लोक खूप श्रीमंत असतात. त्यांना आयुष्यात क्वचितच पैशाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

ज्या व्यक्तीच्या खालच्या ओठांवर तीळ चिन्ह असते, अशा लोकांचे आपल्या क्षेत्रात प्रभुत्व असते. ते जीवनातही खूप प्रगती करतात.

ज्या लोकांच्या हातात अंगठ्याच्या खालच्या भागावर तीळ असतो, त्यांना जीवनात अपार यश मिळते. त्यांना आयुष्यात सर्व भौतिक सुखे मिळतात.

ज्या लोकांच्या तळहातावर तीळ आहे, त्यांच्या संपत्तीत सतत वाढ होत राहते. पण जो तीळ मुठीच्या आत बंद होत असेल तो तीळ अधिक शुभ मानला जातो.

पाठीवर तीळ असणे हे व्यक्तीच्या संपत्तीचे सूचक असते. याव्यतिरिक्त, असे लोक खूप रोमँटिक देखील असतात. असे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर खूप पैसे कमावतात. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते.

ज्या लोकांच्या अनामिकेवर तीळ असतो, त्यांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात. अशा लोकांच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.

ज्या लोकांच्या करंगळीमध्ये तीळ असतो म्हणजेच त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. नाकावर तीळ असणे हे समृद्ध आणि आनंदी जीवनाचे सूचक मानले जाते.