Sankashti Ganesh Chaturthi 2024: हिंदू कॅलेंडरनुसार, एकादशीप्रमाणे, एका वर्षात एकूण २४ गणेश चतुर्थी येतात. या आधारे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात प्रत्येकी एक चतुर्थी असते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तसेच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी गणेश चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणपतीची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने धनसंपत्ती वाढते आणि अपत्यप्राप्ती होते, अशी एक भावना असते. यावेळी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. जाणून घ्या संकष्टी चतुर्थीतील शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थी २०२४ शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २८ फेब्रुवारीला पहाटे १:५३ वाजता सुरू होत असून २९ फेब्रुवारीला पहाटे ४:१८ वाजता समाप्त होते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankashti ganesh chaturthi 2024 shubh muhurat puja vidhi and mantra dwipriya falgun ganesha chaturthi sjr
First published on: 28-02-2024 at 11:46 IST