Sharad Pawar Astrology: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली होती. एकूणच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची काहीशी पीछेहाट झाल्यासारखी स्थिती होती. त्यातच अजित पवार भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर अशा बातम्याही अधुनमधून येत होत्या. शरद पवार यांच्या त्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे राज्यापासून ते थेट दिल्लीपर्यंत सर्वांनाच बुचकळ्यात टाकल्यासारखी स्थिती होती. ज्येष्ठ नेते शरद पवारावांची कारकीर्द देदिप्यमान असली तरी, राजकारणातील महत्त्वाच्या टप्प्यांवर ग्रहांनी टाकलेल्या गुगली मुळे यशाच्या पाठोपाठ, अपयशही सातत्याने त्यांचा पाठलाग करत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी कुंडली अभ्यासावरून शरद पवारांविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे.

सांप्रत गोचर शनि भ्रमण कुंभ राशीतून सुरू असून, गुरु नुकताच मेष राशीत आलेला आहे. याच मेष राशीत राहूचे भ्रमण सुरू आहे. तसेच हर्षलचे भ्रमण मेष राशीतूनच, सुरू असल्याने आणखी बिकट वाट होत जाणार आहे. १० मे रोजी मंगळाचा कर्क राशीत प्रवेश झाला आहे. हा मंगळ प्रथम राहू, त्यानंतर गुरु व शनि यांच्या केंद्रातून जाणार आहे.(त्यांच्या मूळ कुंडलीतून) त्यामुळे हा मंगळ पक्षातील दरी वाढवत जाणारा आहे.

Hindu Manusmriti and William Jones
विश्लेषण: भारतात वादग्रस्त ठरलेली मनुस्मृती चर्चमध्ये; का आणि कशासाठी?
Loksatta editorial Court verdict in the case of the murder of Dr Narendra Dabholkar to eliminate superstition
अग्रलेख: श्रद्धा निर्मूलन!
Abdul Ghaffar Khan,
“अब्दुल गफ्फार खान यांना गांधीनिष्ठेचे मोल चुकवावे लागले,” प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे मत; म्हणाले…
What Sanjay Raut Said?
संजय राऊतांची फतव्यावर टीका, “राज ठाकरेंची औरंगजेबी वृत्तीच्या लोकांना साथ, हे पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला..”
Nagpur, Smartphones, parents,
‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार”
Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान

पवार यांच्या मूळ कुंडलीत राहू षडाष्टक गुरु व राहू षडाष्टक शनी असल्याने, त्यांच्या गुप्त शत्रूंमध्ये प्रचंड वाढ प्रथमपासूनच होती आणि या शत्रूंकडून वारंवार शह देण्याचा अयशस्वी प्रयत्न झालेला असला, तरी त्यात त्यांची स्वतःची ताकद व बुद्धिमत्ता खर्ची पडलेली आहे. दिनांक १५ जून रोजी रवीने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. ह्या वेळी त्यांच्या मूळ कुंडलीतील रवीला हा मिथुन रवी सहावा राहणार आहे. दिनांक २४ जूनला बुध हा मिथुन राशीत प्रवेश करत असल्याने, आरोग्याची आणखी काळजी करायला लागणार आहे. कारण वृश्चिक लग्नाचा अष्टमेश बुध असल्याने असे घडणार आहे, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

दिनांक १६ जून रोजी हर्षलने कृत्तिका या राक्षसगणी नक्षत्रात प्रवेश केलेला असल्याने, जून व ३१ जुलै पर्यंतचा संपूर्ण कालखंड अत्यंत तापदायक जाणार आहे. या कालखंडात त्यांना स्वतःला खूप जपावे लागेल.

हे ही वाचा<< २४ एप्रिल २०२४ ही तारीख अजित पवारांसाठी खूप महत्त्वाची कारण… ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांची भविष्यवाणी

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुंडली २०२४ च्या एप्रिल पर्यंत सुधारण्याची शक्यता कमीच असल्याने, नोव्हेंबरनंतर पक्षाला स्वतंत्र विचार
करावाच लागणार आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण उदयराज साने यांच्या लेखातील भाग दोन मध्ये जाणून घेऊया…