Vipreet Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीत राशी बदलतात आणि शुभ आणि अशुभ योग तयार करतात; ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा अन्य ग्रहांची युती, संयोग होऊन काही शुभ योग, राजयोग तयार होत असतात. या राजयोगांचा अतिशय सर्वोत्तम लाभ काही राशींना मिळत असतो. यात देवतांचा गुरू, गुरुने १ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना आर्थिक लाभ आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती करता येऊ शकते. या काळात त्यांना करिअर आणि व्यवसायात एक प्रकारे लॉटरीच लागू शकते. या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया…
तूळ
विपरीत राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. तसेच, या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. आर्थिक स्थितीतही सुधारणा होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे, यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहून कौटुंबिक कलह दूर झाल्याने डोकंही शांत राहू शकते.
धनू
विपरीत राजयोगाची निर्मिती धनू राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील. विविध आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला नफा होऊ शकतो. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही लवकर परत मिळू शकतात. यावेळी नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. या कालावधीत केलेली गुंतवणूक तुम्हाला दुप्पट नफा देणार आहे. तसेच तुम्ही वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता.
कर्क
विपरीत राजयोग कर्क राशीसाठीदेखील फलदायी ठरू शकतो. या काळात गुरूच्या प्रभावामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी नोकरदार लोकांना या काळात काही मोठे यश मिळू शकते. याशिवाय, या कालावधीत तुम्हाला अनेक आश्चर्यकारक संधीदेखील मिळतील. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यामुळे घरातील वातावरणदेखील आनंदी राहील.