PM Narendra Modi Astrology: भारतात २०२३ मध्ये महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होत असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याचसाठी आपण फलज्योतिषाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींची कुंडली तपासणार आहोत. उदयराज साने यांच्या माहितीनुसार, २०२३ च्या वर्ष अखेरीस चंद्राच्या केंद्रात हा गोचर शनि राहणार आहे, त्यामुळे त्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच पंतप्रधानांना काही निर्णयात फेरबदल करावे लागणार आहेत.

नव्या वर्षात २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२३ या काळात त्यांच्या कष्टात अधिक भर पडणार आहे. २८ नोव्हेंबरला गोचर राहू मीन राशीत प्रवेश करतो. गोचर राहूचे भ्रमण पंतप्रधानांच्या कुंडलीतन पंचमातून होत आहे. आगामी कालखंडात गोचर शनि भ्रमण कुंभ राशीतूनच होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या चतुर्थातून हे शनी भ्रमण होणार आहे. यामुळेच २१ एप्रिल नंतरच्या सर्व निवडणुकात पंतप्रधान मोदींना विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Firecrackers brought for Raj Thackeray burn for BJPs Kapil Patil
मनसेचे फटाके, भाजपाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी फोडले; कल्याणमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाची फजिती
Fali Nariman
फली नरीमन ‘हिंदू-धर्माधारित राज्या’बद्दल काय म्हणाले होते?

मोदींसाठी यंदा कष्टच कष्ट!

एकीकडे ग्रह ताऱ्यांची स्थिती फारशी अनुकूल नसताना भारतातील ६ राज्यांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्या आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा डोक्यावर आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते अलीकडेच मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला मोदींची मुंबई वारी ही एका अर्थी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात सुद्धा होती. यावेळी मोदींनी ट्रिपल इंजिन सरकारच्या स्थापनेसाठी मुंबईकरांना साद घातली होती. येत्या काळात असे कष्ट घ्यावे लागणार असल्याचे अंदाज आहेत.

हे ही वाचा<< PM Modi Astrology: नरेंद्र मोदी यांना २०२३ मध्ये किती व काय अडचणी येणार? जाणून घ्या पंतप्रधानांचं राशीभविष्य

दरम्यान उदयराजे साने म्हणतात की, २०२४ च्या निवडणुका नेटकेपणाने पार पडण्यासाठी मुस्लिम समाजाचं सहकार्य मिळवावं लागणार असल्याचं दिसून आल्यानेच, नुकतेच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सभेत मुस्लिम समाजाला तोडू नका, तर जोडा असा नारा देण्यात आला. याच ‘सेजिनस’ तार्‍याजवळील असलेल्या नेपचूनच्या अंत: स्फूर्तीचा हा दाखला होय. अशा परिस्थितीत, आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी ३५० खासदारांचे लक्ष ठेवले असले तरी त्याला कितपत यश येणार काळच ठरवेल.