-सोनल चितळे

Capricorn Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: मकर ही शनीची रास आहे. शनी म्हणजे विलंब, अडथळे, कष्ट, शोक असे काहीसे समीकरण आपण मानतो. परंतु शनी म्हणजे चिकाटी, काटकसर, संयम, दीर्घोद्योग ,सुत्रबद्धता हेही तितकेच सत्य आहे. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये या दोन्ही छटा दिसून येतात. या व्यक्तींमध्ये जीवनात काहीतरी मिळवण्याची धडपड असते. त्या महत्वाकांक्षी असतात पण त्यांना उदासीनताही लवकर येते. त्यांच्यात जिद्द असते , चिकाटी असते. आपली कर्तव्ये त्या निष्ठेने पार पाडतात. अशा या मकर राशीच्या व्यक्तींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या चतुर्थातील मेष राशीतच असेल. त्याच्यासह राहुदेखील २८ नोव्हेंबरपर्यंत मेष राशीतच असेल. मानसिक स्थितीचा समतोल सांभाळावा. २१ एप्रिलपर्यंत तृतीय स्थानातील मीन राशीत गुरू भ्रमण करत आहे. या कालावधीत उत्तम गुरुबल मिळणार आहे. हाती घेतलेली कामे उत्तमरीत्या पूर्ण होतील. विवाहोत्सुक मंडळींच्या संशोधनास यश मिळेल. संतान प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू ठेवा. वैद्यकीय सल्ला वा उपाय उपयोगी पडेल.२१ एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. अडथळा शर्यत सुरू होईल. पण अशा स्थितीत १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश केलेला शनी साहाय्यकारी ठरेल. साडेसातीचा दुसरा टप्पा संपून तिसरा टप्पा सुरू झाला आहे. हा शनी जिद्द, चिकाटी आणि संयम देईल. महत्वपूर्ण घडामोडी घडतील. अशा या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत मकर राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे…

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा

जानेवारी :

शनी आणि गुरूचे उत्तम पाठबळ असल्याने मोठमोठी कामे हातावेगळी कराल. नोकरी व्यवसायात नव्या जबाबदाऱ्यांना संपूर्ण न्याय द्याल. चिकटीची दाद मिळेल. विद्यार्थी वर्गाला ग्रहयोग पूरक आहेत. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास संधी सोडू नका. नोकरी व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. कामानिमित्त प्रवास कराल. हुरूप वाढेल. जोडीदाराच्या साथीने घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. विचारांमुळे मानसिक दमणूक होईल.

फेब्रुवारी :

आत्मविश्वास वाढेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. कलात्मक आणि बौद्धिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवाल. वरिष्ठांचे पाठबळ चांगले मिळेल. विद्यार्थी वर्गाची सर्वांगीण प्रगती होईल. उत्साह वाढेल. जोडीदारासह वैचारिक मतभेद होतील. शब्द जपून वापरावेत. आर्थिकदृष्टय़ा लाभकारक महिना आहे. मेहनतीस उत्तम फळ मिळेल. संतान प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. गुडघे, सांधे, स्नायूबंध यांचे आरोग्य विशेष जपावे लागेल. थंडीचा त्रास वाढेल.

मार्च :

विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगले ग्रहमान आहे. कष्टाचे चीज होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. नवे करार लाभकारक ठरतील. राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण धोक्याची सूचना देणारे आहे. वेळीच सावध व्हावे. प्रलोभनांपासून दूर राहा. जोडीदाराच्या कामकाजात उनत्ती होईल. गुंतवणूकदारांसाठी अभ्यासपूर्वक पैसे गुंतवणे अपेक्षित आहे. मान, गळा आणि थायरॉईड ग्रंथीच्या संबंधीत प्रश्न उदभवेल. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

एप्रिल :

कामाच्या ठिकाणी कारकीर्द गाजवाल. आपली मते सर्वांपुढे ठासून मांडाल. व्यवसायात नवे उपक्रम राबवाल. विद्यार्थी वर्गाला कष्टाचे फळ निश्चित मिळेल. पंचमातील शुक्राचा अनेक दृष्टीने लाभ होईल. करियर, अभ्यास यांसह कला जोपासाल. प्रेमसंबंधात नाती दृढ होतील. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांच्या कर्तृत्वाचे कौतुक करावे. शनीच्या साथीने गुंतवणूक चांगली होईल. छातीत जळजळ होईल. पित्ताचा त्रास वाढेल.

मे :

21 एप्रिलला गुरूने चतुर्थातील मेष राशीत प्रवेश केला आहे. सध्या गुरू, राहू, हर्षल, रवी आणि बुध अशी पंचग्रही मेषेत आहे. मानसिक संतुलन साधणे कठीण जाईल. तोल जाऊ देऊ नका. आतापर्यंतचा संयम तसाच ठेवणे महत्वाचे आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपल्या शब्दाने घोळ वाढू शकतो. विद्यार्थी वर्गाला मेहनातीसह चिकटीची देखील गरज भासेल. षष्ठातील शुक्र आर्थिक स्थिती सुधारेल. भरपूर धनसंपत्ती मिळेल.

जून :

गुरुबल कमजोर असल्याने प्रचंड मेहनत घेणे आवश्यक ठरेल. शनीची साथ असल्याने मेहनतीचे फळ चांगले मिळेल. नोकरीच्या बाबतीत चर्चा सत्रात महत्त्वाचे मुद्दे उचलून धराल. वरिष्ठ मंडळींवर आपल्या सादरीकरणाचा प्रभाव पडेल. व्यवसायात जिद्दीने आगेकूच कराल. जोडीदाराच्या स्वभावानुसार त्याची कामे तो निगुतीने पूर्ण करेल. विद्यार्थी वर्गाला रवी, बुधाच्या पाठबळाने विषय चटकन आत्मसात होईल. संतानप्राप्ती संबंधीत उपाय करताना थोडे सबुरीने घ्यावे.

जुलै :

आर्थिकदृष्ट्या ग्रहमान ठीक आहे. धनसंपत्ती स्थिर राहील. नोकरीमध्ये सहकारी वर्ग मदतीचा हात पुढे करेल. व्यावसायिकांनी मोठी जोखीम पत्करू नये. नव्या संकल्पना सध्या तरी बांधूनच ठेवाव्यात. विद्यार्थी वर्गाचा आलेख प्रगतिकारक असेल. जोडीदार आपल्या बौद्धिक बळावर यशाचे शिखर गाठेल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ मंडळींची मदत होईल. वैचारिक ताणताणावामुळे डोकेदुखी वाढेल.

ऑगस्ट :

स्थावर मालमत्तेसंबंधित कागदपत्रे, कोर्टाची कामे हळूहळू मार्गी लागतील. कायदेशीर पद्धतीने पाठपुरावा केलात तरच लाभदायक ठरेल. नोकरीतील कामात अडथळे येतील. अनावश्यक प्रश्न भेडसावतील. व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक कामाची व्याप्ती वाढवेल. शनी गुरूच्या साथीने विद्यार्थी वर्गाला भरघोस यश मिळेल. जोडीदाराची मेहनत कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडेल. मज्जासंस्थेवर अतिरिक्त ताण येईल.

सप्टेंबर :

मेहनत, बुद्धिमत्ता आणि चिकाटी यामुळे यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक मंडळी नव्या संकल्पना अमलात आणतील. जोडीदाराची उत्तम साथ सोबत मिळाल्याने हुरूप वाढेल. स्थावर मालमत्तेची रखडलेली कामे मार्गी लावाल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करावे. गुरुबल कमजोर आहे. मेहनतीला पर्याय नाही. प्रेमसंबंधात शब्द जपून वापरावेत. पाठीच्या मणक्याचा ताण वाढेल.

ऑक्टोबर :

नोकरी व्यवसायात रवी, मंगळ, बुधाचे पाठबळ उत्तम मिळणार आहे. धडाडीने पुढे जाल. आत्मविश्वास बळावेल. विद्यार्थी वर्गाला अडीअडचणींचा सामना करत पुढे जावे लागेल. जोडीदारासह वादविवाद न घालता एकमेकांचे विचार समजून घ्यावेत. गुंतवणूकदारांना आपल्या पैशाचा परतावा भरपूर मिळेल. स्थावर मालमत्तेची खरेदी, विक्री करताना जागरूक राहावे. आरोग्य चांगले राहील. नियमित व्यायाम आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल.

हे ही वाचा<< Scorpio Yearly Horoscope 2023: वृश्चिक राशीला मंगळ देणार बक्कळ धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

नोव्हेंबर :

भाग्य स्थानातील शुक्र अनपेक्षित धनलाभ देईल. प्रवास आनंददायी होईल. परदेशासंबंधीत कामे पुढे सरकतील. नोकरीच्या बाबतीत अधिकार आणि सन्मान मिळेल. व्यावसायिकांना नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विद्यार्थी वर्गाला यश मिळवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. जोडीदाराला त्याच्या कामाचा ताण जाणवेल. विवाहोत्सुक मंडळींनी गुरुबल कमजोर असल्याने थोडे सबुरीने घ्यावे. दंड, खांदे ,मान आखडेल. २८ नोव्हेंबरला राहू तृतीयातील मीन राशीत प्रवेश करेल.

हे ही वाचा<< Sagittarius Yearly Horoscope 2023: लक्ष्मीकृपेने धनु रास कधी होणार श्रीमंत? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

डिसेंबर :

२८ नोव्हेंबरच्या राहूच्या राशी प्रवेशामुळे गुरूचे फळ चांगले मिळेल. आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. शिक्षणाचा उपयोग कामाच्या ठिकाणी झाल्याने अनुभवाची शिदोरी बळकट होईल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीचे चीज होण्यास विलंब होईल. मन डगमगेल पण धीर सोडू नका. जोडीदारासह क्षुल्लक गोष्टींवरून वाद झाला तरी नात्यात कटुता येणार नाही. एकमेकांना समजून घेणे महत्वाचे ! आर्थिक लाभ होण्यासाठी ग्रहबल चांगले आहे. शुक्र शनीचा योग यशकारक ठरेल.

हे ही वाचा<< Tarot Card: २०२३ मध्ये ‘या’ राशीच्या महिला करतील राज्य! लक्ष्मीची साथ लाभून मिळेल बक्कळ पैसे कमावण्याची संधी

२०२३ या वर्षात सहकारी, मित्रपरिवार, शेजारी यांच्या मदतीचा हात वेळोवेळी मिळेल. भावंडांच्या समस्या सोडवताना मन कष्टी होईल. तरी देखील धीराने घ्याल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. गुरू आणि शनीचे पाठबळ मिळाल्याने मोठ्या घडामोडींसाठी ग्रहमान पूरक ठरेल. आर्थिक गुंतवणूकदारांसाठी वर्षाचा पूर्वार्ध अतिशय लाभकारक ठरेल. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे. कोणताही निर्णय घेताना झटपट न घेता त्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करून मगच निर्णय पक्का करावा. २१ एप्रिलच्यापूर्वी कामानिमित्त वा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग चांगले आहेत. त्यानंतर मात्र प्रचंड प्रयत्न करावे लागतील. विवाह आणि संतती प्राप्तीच्या बाबतीतही असेच खडतर योग आहेत. वातविकार, पित्तप्रकोप, स्नायू, सांधे यांचे विकार बळावतील. मेहनत आणि सातत्य यांचे फळ कुंभेतील शनी नक्की देईल. धीर सोडू नका. २०२३ हे वर्ष मकर राशीला ‘भरपूर कष्ट करा आणि त्याचे फळ कमवा’ असे सांगणारे असेल.