– सोनल चितळे

Sagittarius Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. गुरू हा विद्या, ज्ञान, बुद्धी यांचा कारक ग्रह आहे. तो न्यायी आणि सदाचारी आहे. धनु राशीच्या व्यक्तींना देखील ज्ञानलालसा असते. समाजात त्यांचा लौकिक असतो. त्या दिलदार, उदार असतात. तरीही इतरांवर अधिकार गाजवण्याची त्यांची आंतरिक इच्छा पूर्ण झाली की त्यांच्या जीवाला शांती मिळते. अशा या समाजप्रिय धनु राशीला २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

१७ जानेवारीला शनीने आपल्या तृतीयातील कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनीची साडेसाती आता पूर्णपणे संपली आहे. नवी भरारी घ्यायला नव्या दमाने सज्ज व्हा. पंचम स्थानातील हर्षल व राहू पंखांना बळ देतील. 28 नोव्हेंबरला राहू मीन राशीत प्रवेश करेल. मानसिक स्थितीत अधिक चंचलता येईल. २१ एप्रिलपर्यंत गुरू चतुर्थातील मीन राशीतून भ्रमण करत आहे. गुरुबल कमजोर असूनही गुरू त्याच्या स्वराशीत असल्याने पाठबळ देत राहील. स्थावर मालमत्तेसंबंधीत कामे करण्यास योग चांगले आहेत. २१ एप्रिलनंतर गुरू पंचमातील मेष राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. बराच काळ रेंगाळलेली कामे पुढे सरकतील. विवाह, संतान प्राप्ती यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करा. यश मिळेल. अशा या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत धनु राशीचे २०२३ चे वार्षिक ग्रहफल कसे आहे पाहुयात…

chaturang , infidelity
ईतिश्री : थोडीसी बेवफाई?
Smriti Singh | स्मृती सिंग
“स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!
astrology budha gochar 2024 mercury transit in leo these zodiac sign will be shine an happy
बुधाचा सिंह राशीत प्रवेश; २९ जुलैपासून ‘या’ तीन राशींची श्रीमंती वाढणार! व्यवसायात नफा तर नोकरीत प्रमोशनची शक्यता
Budh Gochar 2024
७ दिवसांनी ‘या’ ४ राशीधारकांना मिळणार पैसाच पैसा? बुधलक्ष्मी कृपेने बदलेल आयुष्य, होऊ शकता अपार श्रीमंत
Elephant Viral Video
जंगलात कार पाहताच हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी गजराज पुढे येताच लोकांच्या किंकाळ्या अन् पुढे घडलं असं की…
monoj jarange replied to chandrakant patil
“तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का?” मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर!
Loksatta chaturanga life husband and wife relationship
इतिश्री : कसोटीनंतरचा नात्यांचा पडताळा!
Joe Biden Donald Trump United States presidential election democratic contenders replace biden
बोलताना अडखळतात, चालताना धडपडतात! बायडन यांची उमेदवारी गेली तर या सहांपैकी कुणालाही मिळू शकते संधी!

जानेवारी :

तृतीय स्थानातील शनी खचलेल्या मनाला उभारी देईल. नवे करार, कागदपत्रे यांच्यासाठी उत्तम ग्रहयोग आहे. गुरूच्या साहाय्याने स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लावाल. व्यवहार फायदेशीर होईल. नोकरी व्यवसायात नवे विचार , संकल्पना अमलात आणण्यासाठी उत्तम आखणी करावी. धरसोडपणा नको. विद्यार्थी वर्गाने उभारी घेऊन कंबर कसली तर यश आपलेच आहे. जोडीदारासह सूर छान जुळतील. आंधळेपणाने पैसा, प्रसिद्धीच्या मागे धावू नका. साथीजन्य आजार बळावतील. पायात पेटके येतील.

फेब्रुवारी :

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ वार्ता समजतील. प्रवास योग आहेत. परदेशाच्या प्रवासाचीही तयारी कराल. जोडीदाराच्या व्यवहारज्ञानामुळे काही गोष्टी खूप लाभदायक ठरतील. त्याच्या सल्ल्याने पुढे जा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासासह कला, क्रीडा या क्षेत्रात नाव गाजवण्याची संधी मिळेल. नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल. नव्या ओळखी होतील. जबाबदारी वाढेल. त्वचेची काळजी घ्यावी. कोरडी होणे, फाटणे, रक्त येणे असे त्रास संभवतात.

मार्च :

मनाची चंचलता वाढेल. ताण वाढेल. शांत डोक्याने विचार करून मगच निर्णय घ्यावा. गुरुची साथ चांगली आहे. विद्यार्थी वर्गाचे चित्त विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतील. या सगळ्या गर्दीतून आपल्याला आपल्याच वाटेवरून निर्धाराने पुढे जायचे आहे हे ध्यानात असू द्या. नोकरी व्यवसायात आपल्या हुशारीचे आणि कष्टाचे चीज होईल. जोडीदारासह तत्वासाठी वाद होतील. त्यात कटुता नसेल. प्रेमसंबंधात डोळसपणे वागा. प्रलोभनांना बळी पडू नका. डोकेदुखीचा आणि पित्ताचा त्रास वाढेल.

एप्रिल :

परदेशासंबंधीत कामे वेग घेतील. उच्च शिक्षणासाठी वा नोकरीनिमित्त परदेशगमन योग आहेत. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कराल. आरोग्य चांगले राहील. जोडीदारासह मिळतेजुळते घ्यावे लागेल. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. धनसंपत्तीत वाढ होईल. कष्टाचे , बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. 21 एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुक मंडळींनी वधु वर संशोधन सुरू करावे. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घेऊन तसे प्रयत्न सुरू करा. यश मिळेल.

मे :

विवाहीत दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ देता येईल. रुसवे फुगवे दूर होतील. विद्यार्थी वर्गाच्या उच्च शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल आहेत. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात मानसन्मान आणि धनसंपत्ती मिळेल. गुंतवणूकदारांना महिन्याच्या मध्यानंतर चांगला परतावा मिळेल. पण मोठी जोखीम स्वीकारू नका. कौटुंबिक समस्या सोडवताना वडीलधाऱ्या मंडळींची मदत होईल. विवाहोत्सुक मंडळींच्या शुभ वार्ता समजातील. मनाविरुद्ध घटनांचा डोक्यात राग घालून घेणे योग्य नाही.

जून :

जोडीदाराच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावेल. एकमेकांच्या साथीने कौटुंबिक प्रश्न सोडवाल. विद्यार्थी वर्गाला नवे विषय आत्मसात करणे सोपे जाईल. शनीची चिकाटी आणि गुरुची प्रगल्भता यामुळे नोकरी व्यवसायात नेटाने आगेकूच कराल. नाविन्यपूर्ण गोष्टी समाजापुढे आणाल. लोकप्रियता मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगले लाभ होतील. रक्तदाब आणि पित्तविकार यांचा त्रास संभवतो. कामाचा ताण न घेता वेळेचे योग्य नियोजन करावे. आपले छंद, आवड यासाठी वेळ राखून ठेवाल.

जुलै :

प्रवास योग चांगला आहे. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. स्वतःच्या हिमतीने नवी, चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थी वर्गाला नव्या शैक्षणिक वर्षात उत्तम यश मिळेल. विवाहोत्सुक मंडळींचे संशोधनकार्य पूर्णत्वास जाईल. जोडीदाराच्या बौद्धिक , वैचारिक पातळीचा सन्मान होईल. नोकरी व्यवसायात बारकाईने लक्ष घालावे. आपल्यातील उणिवा भरून काढाव्यात. संतती प्राप्तीचे योग अत्यंत बलवान आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी अधिक होईल. सावधान !

ऑगस्ट :

सामाजिक कार्यात मन रमेल. परदेशासंबंधीत , उच्च शिक्षणासंबंधीत कामे वेग घेतील. विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नांना उत्तरे सापडतील. मनाजोगते शिक्षण घ्याल. नोकरी व्यवसायात धैर्य कामी येईल. अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून मोठया कामांना हात घालू नका. फसगत होण्याची शक्यता भासते. मध्यस्थी ओळखीचा असावा. जोडीदार आपल्या परिश्रमाने यशाचे शिखर गाठेल. गुंतवणूकदारांसाठी या महिन्यात अधिक जोखीम आहे. सावधतेने पैसे गुंतवावे. आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

सप्टेंबर :

लहानमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे कराल. इतरांची वाहवा मिळवाल. विद्यार्थी वर्गाने धोपट मार्ग सोडून आडमार्गाने जाऊ नये. मेहनती अंतीच आपल्याला यश मिळणार आहे. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल. सभा संमेलने गाजवाल. जोडीदाराच्या साथीने आपले भाग्य उजळेल. धनसंपत्ती , प्रसिद्धी मिळेल. विवाहोत्सुक मंडळींची जोडीदार निवड योग्य ठरेल. छाती, पोट आणि उत्सर्जनाचे विकार त्रासदायक ठरतील.

ऑक्टोबर :

बेधडकपणे पुढे जाण्याची हिंमत मिळेल. आर्थिक आलेख उंचावेल. नोकरीत कष्ट आणि प्रामाणिकपणा यांची दखल घेतली जाईल. शनी व गुरूच्या साथीने तसेच शुक्राच्या प्रभावाने व्यवसायात उन्नती होईल. मोठी भरारी घ्यायची तयारी ठेवा. संधीचे सोने करा. विद्यार्थी वर्गाला प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा यात विशेष यश मिळेल. विवाहोत्सुक मंडळींसाठी ग्रहमान चांगले आहे. जोडीदाराची साथ सोबत प्रशंसनीय असेल. आमवातामुळे सांधे आखडतील. वैद्यकीय सल्ला व उपचारांची गरज भासेल.

हे ही वाचा<<Libra Yearly Horoscope 2023: तूळ राशीला लक्ष्मी कधी करणार श्रीमंत? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

नोव्हेंबर :

रवी, मंगळाची ऊर्जा आणि शुक्राची सौंदर्य दृष्टी, निर्मिती क्षमता यांनाचा आपल्या कामात खूप उपयोग होईल. कला, छंद यात मन रमेल. नोकरी व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. इतरांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत फळास येईल. जोडीदारासह तत्वनिष्ठ वाद होतील. कौटुंबिक मतभेद वाढू देऊ नका. 28 नोव्हेंबरला राहू चतुर्थ स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. युरिन इन्फेक्शन , गर्भाशयाचे विकार यासंबंधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

हे ही वाचा<<Scorpio Yearly Horoscope 2023: वृश्चिक राशीला मंगळ देणार बक्कळ धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

डिसेंबर :

ग्रहबल खूप चांगले असल्याने हाती घेतलेली कामे चोखपणे पूर्ण कराल. लाभतील शुक्र मोठे लाभ करून देईल. प्रयत्नांत कसूर करू नका. कुंभेतील शनी जिद्द आणि चिकाटी देईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात , तंत्रज्ञानात उत्तम यश मिळेल. जोडीदाराच्या अडीअडचणी दूर कराल. अहं भाव बाजूला ठेवा. नोकरी व्यवसायात उत्तम प्रगती होईल. यशाचे झेंडे फडकवाल. ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

हे ही वाचा<< Tarot Card Reading: २०२३ मध्ये तुमच्या राशीला धनलाभ कधी? टॅरो कार्डस् तज्ज्ञ जयंती अलूरकर यांच्याकडून जाणून घ्या

२०२३ या वर्षात जुने मित्र मंडळी नव्याने भेटण्याची शक्यता आहे. ओळखीच्या व्यक्तींमार्फत काही लाभकारक गोष्टी घडतील. भावंडे, नातेवाईक , शेजारी, सगेसोयरे यांचे वेळोवेळी साहाय्य मिळेल. ही सगळी नाती जपणे तितकेच महत्वाचे आहे. एप्रिलपर्यंत स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. सौदा डोळसपणे करावा. एप्रिलनंतर परदेशगमन योग आहेत. सुरुवातीपासूनच तयारीला लागा. अधिकार गाजवताना इतरांच्या भावनांचा विचार करावा अन्यथा नंतर पश्चाताप करत बसावे लागेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर हे महिने उत्तम परतावा देणारे आहेत. प्रवास , वाहन सौख्य चांगले मिळेल. पचन, रक्ताभिसरण आणि श्वसन संस्था यांची विशेष काळजी घेतलीत तर 2023 हे वर्ष सुखासमाधानाचे आणि चांगल्या आरोग्याचे असेल.