Premium

Surya Gochar 2023: सुर्यदेव करणार मिथून राशीत प्रवेश, ‘या’ ५ राशींचे नशीब फळफळणार? मिळू शकतो भरपूर पैसा अन्…

Surya Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार सुर्याला सौरमंडळाचा राजा मानले जाते. १५ जूनला सुर्य बुध राशीतून मिथून राशीत मार्गक्रमण करणार आहे. गुरुवार १५ जूनला सकाळी ६.१७ मिनिटांनी सुर्य मिथून राशीमध्ये प्रवेश करेल.

surya gochar 2023 on 15 june in mithun rashi these zodiac sign lucky of sun transit
सुर्यदेव करणार मिथून राशीत प्रवेश, या ५ राशींचे नशीब फळफळणार! ( फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स)

Sun Transit 2023: ज्योतिषशास्त्रानुसार सुर्याला सौरमंडळाचा राजा मानले जाते. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. आता येत्या १५ जून रोजी, संपूर्ण वर्षानंतर सुर्य बुध राशीतून मिथून राशीत मार्गक्रमण करणार आहे. गुरुवार १५ जूनला सकाळी ६.१७ मिनिटांनी सुर्य मिथून राशीमध्ये प्रवेश करेल ज्यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळेल असे मानले जाते. असं म्हणतात की, या काळात सूर्य मार्गक्रमणामुळे मिथुन राशीसह या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल. तसेच ‘या’ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायमध्ये खूप फायदा होईल असेही मानले जात आहे. चला जाणून घेऊया सूर्य संक्रमणामुळे कोणाला फायदा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्क राशि (Cancer): ज्योतिषशास्त्रानुसार सुर्याने मिथून राशीमध्ये प्रवेश केल्याने कर्क राशींच्या लोकांचा फायदा होऊ शकतो. दरम्यान या काळात अडकलेली काही कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो असे मानले जात आहे .यासोबतच तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल असेही मानले जात आहे. असं म्हणतात की, नोकरी-व्यवसायाशी संबंधित लोकांना पदोन्नती मिळू शकते आणि व्यवसायातही फायदा होईल. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.

कन्या रास (Vigro) : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा मिथून राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा कन्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. या काळात तुमचे करिअर यशाच्या शिखरावर असेल असे मानले जाते. असं म्हणतात की, या काळात तुमच्या कार्यक्षेत्रा तुमच्या कार्यक्रमाचे कौतूक केले जाईल आणि आर्थिक स्थिती देखील आधीपेक्षा चांगली होईल.

हेही वाचा – शेवटच्या श्वासापर्यंत शत्रुत्व ठेवतात ‘या’ राशीचे लोक! तुम्ही तर नाही ना त्यांच्यापैकी एक?

सिंह रास (Leo): ज्योतिषशास्त्रानुसार, सुर्य ग्रह हा सिंह राशीचा स्वामी आहे. अशा परिस्थितीमध्ये सुर्याच्या मार्गक्रमनाचा या राशीच्या जातकांना फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. तसेच तुमच्या संबधांमध्ये सुधारणा होईल आणि प्रेम संबधांमध्ये प्रगती होईल मानले जाते. असं म्हणतात की या काळात या राशीच्या जातकांना धन लाभ होईल आणि आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी या काळात भाग्याची साथ मिळेल.

कुंभ रास (Aquarius): ज्योतिषशास्त्रानुसार, सुर्याचे गोचर हे कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरू शकते. या काळात कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि कौंटुबिक नात्यामध्ये सलोख्याचे संबध तयार होतील असे मानले जाते. असं म्हणतात की हा काळ विद्यार्थांलसाठी देखील अनुकूल असेल आणि नोकरी -व्यवसायामध्ये देखील प्रगती होईल.

हेही वाचा – ‘या’ सात राशींच्या व्यक्ती असतात उत्तम नवरोबा होण्यास पात्र? स्वभावाने असतात प्रेमळ, जोडीदाराची घेतात काळजी!

मकर रास (Capricorn): : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे मार्गक्रमन तुम्हाला आर्थिक लाभ देईल, त्यामुळे आर्थिक प्रगती होईल आणि त्याच वेळी धन कमाईचे अनेक नवीन मार्गही उघड होतील. या काळात कर्जापासून मुक्तीही मिळू शकते असेही मानले जाते. असं म्हणतात की, अशा लोकांना जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 17:37 IST
Next Story
‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात? चिडचिड व रागामागे असू शकतो ‘हा’ समज