Shukra Rashi Parivartan: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ कर्क, कन्या आणि मीन राशींसाठी असेल चांगला काळ; नोकरी आणि व्यवसायात होईल भरभराट

कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राची ही स्थिती शुभ राहील.

Shukra Rashi Parivartan: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ कर्क, कन्या आणि मीन राशींसाठी असेल चांगला काळ; नोकरी आणि व्यवसायात होईल भरभराट
३१ ऑगस्टपर्यंत 'या' कर्क, कन्या आणि मीन राशींसाठी असेल चांगला काळ(फोटो: संग्रहित फोटो)

७ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत गेला आहे. आता ३१ तारखेपर्यंत तो या राशीत विराजमान राहील. कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राची ही स्थिती शुभ राहील. त्याच वेळी, पाच राशींसाठी ही वेळ योग्य असणार नाही. या व्यतिरिक्त इतर चार राशींवर शुक्राचा संमिश्र प्रभाव दिसून येईल. तर जाणून घ्या ३१ ऑगस्टपर्यंतचा काळ कोणासाठी शुभ असेल आणि कोणासाठी अशुभ.

कर्क, कन्या, मीन राशीसाठी असेल शुभ काळ

कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना शुक्राच्या चाली बदलामुळे नोकरीचे फायदे मिळतील. कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना चांगला काळ जाईल. या तीन राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो. कामाचे कौतुक होईल आणि पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. नशीबाचीही साथ मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. स्वतःवर खर्च कराल. छंद पूर्ण होतील आणि विश्रांतीही मिळेल.

( हे ही वाचा: Saturn Transist: शनिदेव ‘या’ राशींच्या कुंडलीत बनवत आहेत महापुरुष राजयोग; ऑक्टोबरपर्यंत कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही)

वृश्चिक राशीसह या ४ राशींसाठी असेल सामान्य वेळ

कर्क राशीत शुक्राचे आगमन असल्याने मेष, वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वेळ सामान्य राहील. या राशीच्या लोकांचे आरोग्य सुधारेल, परंतु दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढू शकतो. साथीदाराची साथ मिळू शकते. त्यामुळे बरीच कामे मार्गी लागतील.

मेष, सिंह आणि धनु राशीसाठी अशुभ काळ

शुक्राच्या चाली बदलामुळे सिंह, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. या लोकांचा खर्च वाढू शकतो. वैवाहिक सुख कमी होऊ शकते. गुपिते उघड होऊ शकतात. मेहनत वाढेल. जोडीदारासोबत संबंध बिघडू शकतात. रागावर नियंत्रण न ठेवल्याने भांडण होऊन मोठे नुकसान होऊ शकते.

( हे ही वाचा: ‘या’ ३ राशींना शनिदेवाच्या उलट चालीचा फायदा होईल, जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)

शुक्रावरून मंगळाची दृष्टी दूर होईल

शुक्राच्या राशी परिवर्तनानंतर १० तारखेलाच मंगळही वृषभ राशीत जाईल. यामुळे शुक्रावर पडणारी चौथी दृष्टी दूर होईल. यामुळे शुक्राचे शुभ परिणाम वाढतील. गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेला अंगारक योग मंगळ राशी बदलल्यावर संपेल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Till 31st august will be a good time for cancer virgo and pisces signs there will be prosperity in job and business gps

Next Story
Raksha Bandhan 2022: भद्रा काळात का बांधू नये भावाला राखी? जाणून घ्या यामागचं कारण आणि रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी