News Flash

बुकबातमी :  स्त्रीकेंद्री अर्थशास्त्राची नवी (पुस्तक)रूपे..

‘अर्थशास्त्र’ या शब्दाचा संस्कृतमधील वापर एका विशिष्ट काळात प्रथम झाला, तो काळ जगभरात पूर्णत: पुरुषकेंद्री होता. लिंगभाव समानतेची जाणीव गेल्या काही दशकांत विकसित होत असताना,

हे चित्र आहे जेनिफर लिउ ऊर्फ ‘जेन लिव्ह’ यांचे. स्त्रियांविषयीची अनेक चित्रे त्यांनी न्यूयॉर्कर, न्यूयॉर्क टाइम्स आदी प्रकाशनांसाठी केली आहेत.

‘अर्थशास्त्र’ या शब्दाचा संस्कृतमधील वापर एका विशिष्ट काळात प्रथम झाला, तो काळ जगभरात पूर्णत: पुरुषकेंद्री होता. लिंगभाव समानतेची जाणीव गेल्या काही दशकांत विकसित होत असताना, आणि ‘इकॉनॉमिक्स’ याच अर्थाने आज मराठीसह अन्य भाषांत ‘अर्थशास्त्र’ हा शब्द रूढ झाला असताना स्त्रियांचा या क्षेत्रातील सहभाग वाढतो आहे. अर्थशास्त्रातील संशोधन-पत्रिका व शोधनिबंध यांचा समन्वय साधणाऱ्या ‘रीपेक’ संस्थेकडे जगभरातील ५५,१२३ अर्थशास्त्रज्ञांची नावे- त्यांच्या निबंधसूची, ग्रंथसूचीसह- नोंदलेली आहेत; त्यापैकी १३,८६४ महिला आहेत. म्हणजे एकचतुर्थाशापेक्षा कमीच, ही वस्तुस्थिती असली तरी ही यादी केवळ एका संस्थेकडील आहे आणि तीही विद्यापीठीय अर्थशास्त्रज्ञांची! त्याखेरीजही अर्थशास्त्राच्या अन्य क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत आहेत, उच्चपदांवर आहेत.. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ, जागतिक बँकेच्या विद्यमान प्रमुख अर्थशास्त्रज्ञ पिनेलोपी गोल्डबर्ग आणि त्यांच्या आधी हे पद सांभाळणाऱ्या शान्ता देवराजन, ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी)’ या तिसऱ्या बलाढय़ जागतिक अर्थसंस्थेतील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ लॉरेन्स बून.. रिझव्‍‌र्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, ही काही उदाहरणे. धोरणांवर प्रभाव पाडू शकणारी ही पदे आहेत. जागतिक अर्थसंस्थांची धोरणे अधिकाधिक स्त्रीकेंद्री होताना दिसत असतातच परंतु उषा थोरात यांच्या कार्यकाळात महिलांच्या आर्थिक समावेशनाची धोरणे अधिक व्यापक झाली, हेही उल्लेखनीय आहे. ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका बीना अगरवाल यांनी ग्रामीण, विकासात्मक अर्थशास्त्राच्या संशोधक म्हणून स्त्रियांचा शेतजमिनीच्या मालकीतील सहभाग या विषयाचा पाठपुरावा केला. त्यातून धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढला आणि तो भारत सरकारच्या गळी उतरवला, त्यातून विवाहित मुलींनाही माहेरच्या संपत्तीत हक्क देणारा बदल कायद्यात झाला.

धोरणात्मक आणि त्याआधीच्या – संशोधनाच्या- पातळीवर असे सकारात्मक बदल घडवण्यात स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग दिसत असताना, धोरणांचे परिणाम तपासणे, स्त्रियांना वाव देणाऱ्या किंवा स्त्रियांसाठी खुले झालेल्या क्षेत्रांचे आर्थिक आयाम काय आहेत याचा शोध घेणे असे उपयोजित अर्थशास्त्रीय किंवा आंतरशाखीय लेखनही स्त्रियाच करू लागल्या आहेत. गावोगावच्या बचतगटांतील महिलांपासून ते स्वत:च्या मालकीच्या मोटारींतून लांबलांबचा प्रवास करू पाहणाऱ्या स्त्रियांपर्यंत विविध आर्थिक पातळय़ांवरचे हे अभ्यास पुस्तकरूपाने येत आहेत.  स्त्रीकेंद्री अर्थशास्त्र हे विकासाची नवी रूपे दाखविणारे, पण विकासाच्या रूढ प्रतिरूपांचे परिणाम स्त्रियांवर कसकसे होत आहेत, याचा समाजशास्त्रीय अभ्यास करणारी ही नवी पुस्तकरूपे आहेत.

विशेष पानाच्या बोधचित्राविषयी..

हे चित्र आहे जेनिफर लिउ ऊर्फ ‘जेन लिव्ह’ यांचे. स्त्रियांविषयीची अनेक चित्रे त्यांनी न्यूयॉर्कर, न्यूयॉर्क टाइम्स आदी प्रकाशनांसाठी केली आहेत. त्यापैकी हे, अर्थशास्त्रातील स्त्रियांचा आवाज किती पोहोचतो आहे याचे चित्र! त्यांची चित्रे https://www.jennliv.com/ या संकेस्थळावर पाहायला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 4:31 am

Web Title: women centric new economics books
Next Stories
1 तर्काची अतर्क्य झेप!
2 ‘भारतीय’ होत असलेली लोकशाही
3 काश्मीर वाचलं पाहिजे!
Just Now!
X