औरंगाबादमधील नारेगावातील शेख मंजूर शेख यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. पत्नी आणि मुलाने शेख यांची हत्या केली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसलीम बेगम व शेख सलमान अशी या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारेगावात मंजूर शेख (वय ५०) हे भाड्याच्या खोलीत राहत होते. मंजूर यांनी दोन लग्न केले होते. मंजूर यांचा औरंगाबादमध्ये प्लॉट असून हा प्लॉट आपल्या नावावर करुन द्यावा, यासाठी तसलीम बेगम आणि मुलगा सलमान यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. तर मंजूर यांची दुसरी पत्नीही प्लॉटसाठी पतीशी भांडण करायची. गेल्या शनिवारी रात्री तसलीम आणि मंजूर यांच्यात त्या प्लॉटवरुन भांडण झाले. यानंतर तसलीम आणि सलमान या दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

भावाच्या मृत्यूची माहिती मिळताच मंजूर यांच्या दोन भावांनी खुनाचा संशय घेत अंत्यसंस्कार थांबवले. पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत संशयावरुन तसलीम, सलमान आणि जावयाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अखेर पाच दिवसांनी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad wife son killed husband over property dispute
First published on: 26-01-2019 at 17:05 IST