औरंंगाबाद  मनपा प्रशासन दलित वस्ती विरोधी भूमिका घेऊन विकास कामे करत नसल्याचा आरोप करत वार्ड क्रं १०२, कबीर नगर येथील नगरसेवक राहुल सोनवणे यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांना शनिवारी दि.१९ रोजी लेखी पत्राद्वारे दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनावणे यांनी पत्रात नमूद केल्याप्रमाणे कबीर नगर वार्डातील समस्या आयुक्तांना वारंवार सांगूनही प्रश्न मार्गी लागले नाहीत. मागील तीन वर्षांपासून वार्डात दूषित पाण्याची समस्या आहे. नाल्याचे दुरुस्तीचे काम होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. याचबरोबर वार्डातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मनपाच्या मोकळ्या जागेला गेट नसल्याने अनेक वाहने याठिकाणी लावली जात आहेत. मालमत्ता विभाग याची दखल घेत नाही. वरील कामे जर २५ जानेवारी पर्यंत झाली नाहीत तर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी मनपासमोर आत्मदहन करण्याचा इशारा नगरसेवक राहुल सोनवणे यांनी दिला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurngabad muncipal corpration corprater sucide warning
First published on: 20-01-2019 at 08:25 IST