शासकीय बदल्या, बढत्या आणि नियुक्त्या करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी नावे वापरून कोट्यवधींची माया गोळा करणाऱ्या गणेश बोरसेची बनवेगिरी शोधण्यासाठी पोलीस त्याच्या गर्लफ्रेंन्डला ताब्यात घेणार आहेत. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात बोरसेचे अनेक एजंट होते. त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र हे जाळ खुप मोठं असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे याचा छडा लावण्यासाठी पोलीस बोरसेच्या गर्लफ्रेंन्डला ताब्यात घेणार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने बोरसेने अनेक जणांना ‘टोप्या’ घातल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या नावाने तो हा धंदा करायचा. त्यानं आतापर्यंत अनेकांना चुना लावला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh borse investigation case police now arrest his girlfriend
First published on: 27-05-2017 at 20:34 IST