बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या केंद्रावर औरंगाबाद पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. सुमेय्या अंजूम या महिलेने तक्रार केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली असून गर्भपात केंद्रातून  डॉक्टासह एका मदतनीसाला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमेय्या अंजूम या महिलेचे १९ एप्रिलरोजी डॉ. गायकवाड यांच्या गर्भपात केंद्रात गर्भपात करण्यात आले होते. सुमेय्या अंजूम यांच्या इच्छेविरोधात हा गर्भपात झाला होता. सुमेय्या यांचे पती सलाउद्दीन आणि सासरे शहबोद्दीन यांनी त्यांना जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. मात्र हा अन्याय सुमेय्याने सहन केला नाही. त्यांनी आईवडीलांच्या मदतीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून गर्भपात केंद्रातील डॉक्टरांना पकडले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal abortion centre busted in aurangabad doctor arrested
First published on: 24-05-2017 at 23:31 IST