भाजपा नेते आणि लोकविकास सहकारी बॅंकेचे संस्थापक जे.के. उर्फ जगन्नाथ खंडेराव जाधव यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा ऊर्फ किशोर रतन चिलघर या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून कृष्णा हा जाधव यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. नोकरीसाठी पैसे भरुनही नोकरी मिळत नसल्याने कृष्णाने आत्महत्या केली.

कृष्णा चिलघर हा औरंगाबादमधील संजयनगर येथे राहत होता. तो लोकविकास बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्थेचे अध्यक्ष जे.के जाधव यांच्याकडे दोन वर्ष कारचालक म्हणून काम करत होता. त्याला महिन्याला १० हजार रुपये इतके पगार होता. जाधव यांनी कृष्णाला संस्थेअंतर्गत येणाऱ्या राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट या चिकलठाणा एमआयडीसीतील संस्थेत शिपाई पदावर नोकरी लावून देतो असे आश्वासन दिले. या मोबदल्यात त्यांनी तीन लाख रुपयांची मागणीही केली.

man arrested from gujrat after 12 years in wife assulting case
पत्नीला मारहाण प्रकरणात अटक टाळण्यासाठी १२ वर्षे पसार; गुजरातमध्ये नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या एकास अटक
salman khan firing case marathi news,
सलमान खान गोळीबार प्रकरण: पंजाबमधून अटक आरोपींना घेऊन पथक मुंबईत दाखल, आज न्यायालयापुढे हजर करणार
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट

तीन लाख रुपये नसल्याने कृष्णाने लोकविकास नागरी सहकारी बँकेतून कर्ज घेतले. बँकेने त्याला एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. कृष्णा संस्थेत शिपाई म्हणून रुजू झाला होता. कृष्णाने जून २०१७ रोजी जाधव यांना एक लाख ६० हजार रुपये दिले होते. तर शिपाई पदावर कायम झाल्यावर उर्वरित रक्कम (१ लाख ४० हजार) देण्याचे ठरले होते. जाधव यांनी कृष्णाकडून दोन कोरे धनादेशही घेतले होते. सहा महिन्यांनी म्हणजेच ३० डिसेंबर २०१७ रोजी कृष्णाने शिपाई पदावर कायम करण्याबाबत व पगाराबाबत जाधव यांच्याकडे विचारणा केली. उर्वरित रक्कम दिल्यावरच पदावर कायम केले जाईल, असे जाधव यांनी कृष्णाला सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि शेवटी जाधव यांनी कृष्णाला कामावरुन काढून टाकले. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याने जाधव यांच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यावेळी जाधव यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच त्याला धमकी देखील दिली. जे के जाधव वर्षभरापूर्वीच काँग्रेसमधून भाजपात आले.

पोलिसांनी केले दुर्लक्ष
१० फेब्रुवारी २०१८ रोजी कृष्णाने जिन्सी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांच्याकडे तक्रार अर्ज केला. याशिवाय मार्च २०१८ रोजी पोलीस आयुक्तांना देखील तक्रार अर्ज दिला होता. यात म्हटले होते की, पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. माझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईतील गुंडाकडून धमक्या येत आहेत. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना देखील भेटून आलो. पण माझे म्हणणे कोणीही ऐकून घेत नाही , असे यात म्हटले होते.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कृष्णा म्हणतो…
कृष्णाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. यात तो म्हणतो, ‘जे. के. जाधव व विक्रांत जाधव हे दोघेही पिता-पुत्र आहेत. त्यांनी आपल्या नावावर लोकविकास बँकेतून एक लाखाचे कर्ज घेतले. त्यांना एक लाख साठ हजार रुपये दिल्यानंतर देखील माझ्यावर अन्याय करुन कलम १३८ नुसार कोर्टात खटला दाखल केला. मी पोलिसात तक्रार करुनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. फक्त पैसा चालतो, गरीब माणसाला न्याय भेटत नाही. जिन्सी पोलिस ठाण्यात दोन महिने चकरा मारल्या. पण त्याचा काही फायदा झाला नाही. उलट माझ्याविरुध्द दाखल केलेल्या गुन्हयाचा तपास उगले व काकडे यांच्याकडे सोपवण्यात आला. या दोघांनी आपल्याकडे वीस हजारांच्या लाचेची मागणी केली. पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी हा प्रकार निरीक्षक हाश्मी यांना सांगितला. तेव्हा त्यांनी उपायुक्त श्रीरामे यांचे रेकॉर्डींग ऐकवले. जे. के. जाधववर काहीही कारवाई करायची नाही. तर बँकेचे औटी, सुर्यवंशी आणि उमेश दिवे हे कायम मारुन टाकायच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे मी परेशान आहे. स्वत:ला संपवत आहे’, असे त्याने म्हटले आहे.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जे के जाधवसह त्यांचा मुलगा विक्रांत, मॅनेजर औटी, सूर्यवंशी आणि दिवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.