‘लोकसत्ता’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या ब्लॉग बेंचर्स स्पर्धेत यशस्वी झालेल्या सौरभ कुलकर्णी यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र एम. पी. लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या भाग्यश्री परांजपे-गोडबोले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
‘हकनाक हणमंतप्पा’ या विषयावर लिहिलेल्या ‘ब्लॉगला ७ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्याचा धनादेश उपप्राचार्याच्या हस्ते देण्यात आला. माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रा. दिनेश कोलते, डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, शीतल बाराते, प्रतिभा गिरमाने तसेच सौरभची आई स्मिता व सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांनी या वेळी ‘लोकसत्ता’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाची माहिती दिली. लोकांकिका, वक्तृत्व स्पर्धेतही महाविद्यालयातील तरुण अधिकाधिक सहभागी होतील, असे या वेळी गोडबोले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta blog benchers saurabh kulkarni first
First published on: 01-03-2016 at 01:36 IST