मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी ध्वजारोहणास उपस्थित राहण्यास इम्तियाज जलील यांचा होकार

औरंगाबाद :  हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे स्मरण म्हणून १७ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास गेली सात वर्षे सतत गैरहजर असणारे खासदार इम्तियाज जलील यांनी या वर्षी ध्वजारोहणास उपस्थित राहू, असे स्पष्ट केले आहे. मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन अर्थात एमआयएम या पक्षाचा इतिहास निजामाशी जोडलेला असल्याने खासदार जलील या कार्यक्रमास हजर राहात नव्हते, अशी टीका त्यांच्यावर होत असे. या वेळी मात्र ‘कोण रझाकार माहीत नाही’ असे म्हणत आम्हीही मराठवाडाप्रेमी आहोत, असा दावा खासदार जलील यांनी केला आहे. ध्वजारोहणाला उपस्थित राहताना त्यांनी राजकीय पटावर खेळलेली तिरकी चाल चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाड्याविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ एक दिवस ध्वजारोहण करणे हा निकष कसा असू शकतो, असा प्रश्न उपस्थित करत खासदार जलील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर मंगळवारी टीका केली होती – ‘औरंगाबाद शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत. पाणी शुद्ध मिळते आहे. मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न सोडवून झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या ताफ्यावर फुले उधळू,’ असे उपरोधिकपणे म्हणत राजकीय तिरकी चाल त्यांनी खेळली आहे. १७ सप्टेंबरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे न सुटलेले प्रश्न अधोरेखित करत ध्वजारोहणाला उपस्थिती लावू, असे खासदार जलील यांचे म्हणणे वेगवेगळ्या पातळीवर तपासले जात आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim new politics imtiaz jaleel to attend the flag hoisting on marathwada liberation day akp
First published on: 16-09-2021 at 00:09 IST