छत्रपती संभाजीनगर :  देशभरातून मागील तीन वर्षांमध्ये ६७.९६ लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. यातून भारतीय चलनानुसार दहा हजार ७७५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. एकूण निर्यातीमध्ये ८० ते ८५ टक्के वाटा महाराष्ट्राचा असल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ऑगस्टपासून कांदा निर्यात नसून, त्यावरील शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढवल्याने उत्पादकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. उत्पादकांमध्ये सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कोंडी झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

 मागील तीन वर्षांमधील एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षांत १५.७६ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यातून दोन हजार ८२१ कोटी रुपये मिळाले होते. सन २०२१ ते २०२२ या वर्षांत निर्यात १५.३७ लाख टन कांद्यातून तीन हजार ४३२ कोटी रुपये मिळाले होते. तर सन २०२२-२३ या वर्षांमध्ये २५.२५ लाख टन कांद्यातून चार हजार ५२२.७९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सन २०२३ ते २०२४ या चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांपर्यंत ११.५८ लाख टन कांद्याची निर्यात झाली असून, त्यातून एक हजार ८३३.२२ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली.  कांद्याच्या निर्यात शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये केलेली ही शुल्कवाढ डिसेंबरअखेपर्यंत कायम राहणार आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कांदा उत्पादकांना उत्तम प्रतीचा कांदा निर्यात करता आला, तर फायदा होणार असल्याचे पणन महामंडळाच्या विचार गट समितीचे औरंगाबाद विभाग सदस्य सीताराम वैद्य यांनी सांगितले.

Loksatta explained Shortage of maize in market committees across the country
विश्लेषण: देशभरातील बाजार समित्यांमध्ये मक्याचा तुटवडा?
Violence Against Women
बलात्कार, घरगुती हिंसाचार अन् शोषण! ‘या’ देशांमध्ये महिला सुरक्षा धोक्यात, दिवसाला तीन हजार गुन्ह्यांची नोंद; अभ्यासातून धक्कादायक खुलासे!
Malegaon Bomb Blast Case Final Argument Begins Today Mumbai
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण :आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात, खटल्याची सुनावणी शेवटच्या टप्प्यात
Gold prices, Budget, Gold prices fall,
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात आपटी, हे आहेत आजचे दर
local, accidents, injured,
लोकल अपघातात रोज सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू, जखमींच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ
42 lakh new demat accounts added in june total crosses rs 16 crore
डिमॅट खाती १६ कोटींपुढे
average price of a vegetarian thali increased by 10 percent in the month of june
जूनमध्ये शाकाहारी थाळी महाग; मांसाहारी थाळी मात्र स्वस्त!
Air Pollution in Delhi
भारतातील १० शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात, वर्षाला ३३ हजार मृत्यू; महाराष्ट्रातील ‘हे’ शहर धोकादायक

हेही वाचा >>>सिलिंडरला गळती; घरगुती साहित्याला आग

निर्यातशुल्क वाढवल्याने निर्यात मंदावली आहे. निर्यात नसल्यामुळे कांदा विक्री देशांतर्गत बाजारपेठेतच होते. परिणामी आवक वाढून कांद्याचे दर ढासळतात. त्याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. दुष्काळी परिस्थितीत निर्यात शुल्क कमी केले तर निर्यात करता येईल आणि त्याचा फायदा उत्पादकांना होईल. निर्यात शुल्क कमी करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे – सीताराम वैद्य,  ‘पणन’ विचार सदस्य