scorecardresearch

“औरंगजेबाची कबर औरंगाबादमधून हटवा, अन्…”; आमदार संजय शिरसाट यांची मागणी, इम्तियाज जलील यांच्या आंदोलनावरही केली टीका

इम्तियाज जलील यांचं आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी आहे, अशी टीका आमदार संजय शिरसाट यांनीही जोरदार टीका केली.

sanjay shirsat Aurangzeb Tomb news
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्यांच्या आंदोलनाविरोधात भाजपा- शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, जलील यांच्या आंदोलनावर आज शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनीही जोरदार टीका केली. इम्तियाज जलील यांचं आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी आहे, असं ते म्हणाले. तसेच औरंगजेबाची कबर औरंगाबादमधून हटवा, अशी मागणीही त्यांनी केली. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

iहेही वाचा – Maharashtra News Live : “कालच्या सभेतील बोंबा मारायच्या कार्यक्रमाने…”, खेडमधील सभेवरून आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

काय म्हणाले संजय शिरसाट?

“इम्तियाज जलील यांचं आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी आहे. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. मुळात त्यांचे आंदोलन म्हणजे भंकसगिरी आहे. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. औरंगाबाद आणि औरंगजेबचा काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

हेही वाचा – “हा चिपळूनचा लांडगा…”, ‘तात्या विंचू’ म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना रामदास कदमांचा प्रत्युत्तर

“हा वाद नेमका कशामुळे होतो आहे? तर औरंगजेबाच्या कबरीमुळे त्यामुळे त्याची कबर इथून काढा ही आमच्या सहकाऱ्यांची मागणी रास्त आहे. मी सुद्धा याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून ही कबर इथून काढा, अशी मागणी करणार आहे. औरंगजेब आणि या शहराचा काहीही संबंध नव्हता. औरंगजेब येथे येऊन गेला असेल, पण त्याचा मृत्यू इथे झाला नाही. त्यामुळे त्याची कबर हटवलीच पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे, तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…” शरद पवारांचा पत्रकारांना सल्ला

“इम्तियाज जलील आणि त्यांचे सहकारी या शहराचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. बिर्याणी खाऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. हे त्यांचे कोणतं उपोषण आहे? मी याबाबत पोलीय आयुक्तांना भेटणार आहे. आमच्या लोकांवर जो अत्याचार झाला आहे. त्यातून मुक्ती देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यात अशाप्रकारे कोणी निझाम येऊन आमच्यावर दादागिरी करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 13:40 IST