महाराष्ट्र दिनानिमित्त सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात येत आहे. औरंगाबादमधील किनगाव इथं वॉटरकप स्पर्धेत दुःखद घटना घडली. श्रमदानादरम्यान कृष्णराव निकम यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्णराव निकम हे पेशाने वकील होते. कन्नड़ तालुक्यातील नागदपुर येथून किंनगाव येथे ते श्रमदान करण्यासाठी आले होते. त्यांच्या सोबत पत्नी आणि मुलानेही वॉटरकप सपर्धेत सहभाग घेतला होता. निकम कुटुंबीय श्रमदान करत असताना अचानक कृष्णाराव निकम यांना ह्रद्यविकाराचा झटका आला.

प्राथमिक उपचारासाठी पाणी फाऊंडेशनकडून कामाच्या ठिकाणी डॉक्टरांची टीम ठेवण्यात आलेली आहे. मात्र, त्यांच्या हदयविकाराच्या झटक्याची तीव्रता जास्त असल्याने त्यांना औरंगाबादला हलवण्यात आलं. औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आमिर खानने निकम यांच्या कुटुंबियांचे फोनकरून सांत्वन केलं.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyamev jayate water cup paani foundation one social worker died in aurangabad
First published on: 01-05-2017 at 15:06 IST