उद्या (शुक्रवारी) साजऱ्या होणाऱ्या बकर ईदनिमित्त पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. एक हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.
बकर ईदनिमित्त ईदगाह मदानावर, तसेच मशिदीमध्ये मुस्लीम बांधव मोठय़ा प्रमाणात नमाज अदा करतात. या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नमाजाचे ठिकाण, कत्तलखाने, ईदगाह मदानासह इतर ठिकाणी हत्यारबंद पोलिसांची तैनाती असेल. या बरोबरच श्वानपथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवादविरोधी पथक, शीघ्रकृती दल, राज्य राखीव दल यांचा समावेश आहे.
शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभुजा चौक, गुजरी बाजार, बसस्थानक, अण्णा भाऊ साठे पुतळा, खुराणा ट्रॅव्हल्स, रेल्वेस्थानक, आंबेडकर पुतळा आदी ठिकाणी पोलीस तनात असतील.
अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गृहचे उपअधीक्षक विजय कुहीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भांडवले आदींच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यांचा ९० टक्के बंदोबस्त, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांचे पथक, १४ उपनिरीक्षक, बाहेरील जिल्ह्यांतील दोन पोलीस निरीक्षक सहायक व उपनिरीक्षक असे ७९ अधिकारी, परीक्षार्थी १० उपनिरीक्षक, इतर कर्मचारी मिळून ९८१ कर्मचारी, दोन शीघ्रकृती दलाच्या व राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, ७०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात असेल. गुरुवारी पोलीस मुख्यालयात बंदोबस्ताची रंगीत तालीम झाली. पोलिसांनी पथसंचलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security for bakra eid
First published on: 25-09-2015 at 01:40 IST