मुकुंदवाडीतील रहिवासी व व्यवसायाने वेल्डर असलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीने शेजारच्यांशी झालेल्या वादातून मारहाण केल्यानंतर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी महिला पोलिसासह चौघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी खांडेभराड, असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा अमोल शिवाजी खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर धोंडगे व त्यांच्या घरातील तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक जण महिला पोलीस असून एक कंडक्टर आहे. त्यांनी आपल्या वडिलांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुकुंदवाडीतील स्वराजनगरात राहणा‍रे वेल्डर शिवाजी अण्णा खांडेभराड (५१) यांचे शेजारी राहणा-या सुरेखा धोंडगे यांच्याशी घरासमोर माती टाकण्यावरुन १९ ऑगस्ट रोजी भांडण झाले होते. त्यावेळी सुरेखा धोंडगे हिच्यासह तिच्या दोन मुलींपैकी पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या छाया आणि कंडक्टर मुलगी तसेच मुलगा परमेश्वर धोंडगे यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर चौघांनी खांडेभराड हे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास घराबाहेर उभे असताना त्यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यावरुन खांडेभराड यांनी २२ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास पोलिस ठाण्यात जातो असे सांगत थेट मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पंचनाम्यादरम्यान पोलिसांन खांडेभराड यांच्या पँटच्या खिशात आधारकार्ड, रुग्णालयाची पावती आणि सुसाईड नोट आढळून आली. परमेश्वर धोंडगे, सुरेखा धोंडगे, छाया व कंडक्टर महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी महिला पोलिस छाया, तिची कंडक्टर बहीण, भाऊ  परमेश्वर आणि त्यांची आई सुरेखा यांच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दादाराव कोपनर करत आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sucide 51 year man tran police crime fir nck
First published on: 24-08-2020 at 16:51 IST