वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावरील व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांनी शेतकऱ्याकडे चक्क एक लाख २५ हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीनंतर तहसीलदारांना लाच घेताना अटक केली. याप्रकरणी तहसीलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूरचे (जि. औरंगाबाद) तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे व महसूल सहायक अशोक बाबूराव मरकड यांनी आपेगाव येथील तक्रारदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तहसीलदार शिंगटे यांनी तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीमधील सातबाऱ्यावरील कूळ कायद्याप्रमाणे असलेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी ही लाच मागितली होती.

What Ajit Pawar told About Sharad Pawar
‘२०१९ ला भाजपासह जायचं शरद पवारांनी कसं ठरवलं होतं?’ अजित पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी
nalasopara, tulinj police, Crack Down on Landlords, Renting to Foreign Nationals, Without Permission, Renting Foreigners Without Permission, nalasopara news, marathi news, police
परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणार्‍यांवर कारवाई, तुळींज पोलिसांनी २५ घर मालकांवर दाखल केले गुन्हे
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
thane police, 417 criminals
ठाणे पोलिसांची ‘ऑलआऊट’ मोहीम, चार तासांत ४१७ गुन्हेगारांची झाडाझडती; मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त

सातबाऱ्यावरील कूळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांकडून सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा लावला होता. मागणी केलेल्या सव्वा लाखापैकी ७० हजारांची लाच स्वीकारताना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार शिंगटे आणि महसूल सहायक मरकड यांना रंगहाथ पकडले. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पो. नि. विकास घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली.