धर्मग्रंथातील एकम सत्चा संदेश सांगत कीर्तनातून प्रबोधन

औरंगाबाद : वारकरी सांप्रदाय हा वेदप्रणीत आहे. गीता-कुराण या हिंदू आणि मुस्लीम धर्मातील पवित्र ग्रंथांमधून एकम सत् अर्थात ईश्वरी तत्त्व एकच असल्याचा संदेश देण्यात आल्याचे अभ्यासाअंती पटल्यानंतर ताजुद्दीन नूर महंमद उर्फ सच्चिदानंदगिरी महाराजांना मानवता हाच खरा धर्म आणि सर्व जातीधर्माना सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय जवळचा वाटला. त्यातूनच त्यांनी आपला भाव पांडुरंगी दृढ करून कीर्तनसेवेतून प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.  राज्यासह देशाच्या विविध प्रांतांमधून ताजुद्दीन महाराज हे कीर्तन-प्रवचनासाठी वलयांकित नाव झालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाथ षष्ठीला पैठणची आणि आषाढीला पंढरपूरची वारी हा महाराजांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला तो पांडुरंगाच्या ओढीनेच. महाराजांचा संत वचनांसह गीता, कुराणाचाही गाढा अभ्यास असून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करतानाही दिसतात. हिंदू-मुस्लीम धर्मामधील द्वेषाची दरी ही केवळ परस्परांची भाषा येत नसल्यामुळे अधिकच रुंदावल्याचे महाराज सांगतात. मुस्लीमांना संस्कृत आणि हिंदूंना उर्दू-अरबी भाषा अवगत झाल्यानंतर गीतेतील श्लोक व कुराणांमधील हदीस, आयते यांचा अर्थबोध होईल आणि एकमेकांविषयी तयार झालेली द्वेषाची जळमटे गळून पडतील, असा विश्वास महाराजांना वाटतो.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tajuddin maharaj panduranga strong feelings ashadi ekadashi ssh
First published on: 20-07-2021 at 00:30 IST