सेक्स रॅकेटसाठी मुली पुरविणाऱ्या आंटीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स, व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंग एका शिक्षकाच्या अंगाशी आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सचिन राऊत या शिक्षकाला पोलिसांनी तुळजापूर सेक्स रॅकेटप्रकरणी शुक्रवारी अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे.

तुळजापूर येथील हॉटेल पावन रिसॉर्टवर अपर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ जून रोजी छापा मारून मुली पुरवणाऱ्या दीपा वाघमारे, हॉटेलचा व्यवस्थापक नितीन पाटील याच्यासह चौघांना अटक केली होती. त्यानंतर सहा आणि त्यानंतर दोघांना अशा १२ जणांना अटक करून जामिनावर सोडून दिले होते. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांची भूमिका संशयास्पदरीत्या सुरू असल्याचे माध्यमांतून समोर आल्यानंतर तुळजापूरचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आणि स्वत: अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी कारवाईचा धडाका सुरूकेला.

Watch Rohit Sharma wins hearts after MI video captures him meeting wheelchair-bound fan
“हेच रोहितने कमावले !” व्हिलचेअरवर बसलेला चाहता रोहित शर्माला भेटला, हृदयस्पर्शी व्हिडीओने जिंकले नेटकऱ्यांचे मन
Gautam Gambhir Secret Obsession Made KKR Struggle To Find Room In Hotel
गौतम गंभीरसाठी KKR ला हॉटेल शोधताना अडचणी, वसीम अक्रमने उघड केलं सिक्रेट; म्हणाला, “त्याचा हट्ट..”
master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…

न्यायालयातील खटला मागे घेण्याच्या कारणावरून तरुणाचा खून
बीड : आईला मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर आरोपीने खटला मागे घेण्याच्या कारणावरून फिर्यादी संतोष पुनाजी घडसिंग (वय ३५) याच्यावर लवूळ येथे चाकूने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपी बाळू घडसिंग हा फरार झाला आहे. माजलगाव तालुक्यातील लवूळ येथील संतोष पुनाजी घडसिंग हे आपल्या कुटुंबीयासह मोलमजुरी करून राहत होते. चार वर्षांपूर्वी मृत संतोषची आई विमल पुनाजी घडसिंग (वय ६०) यांना आरोपी बाळू बाबुराव घडसिंग याने मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन खटला न्यायालयात सुनावणीसाठी आला आहे. दोघेही एकाच भावकीतील असल्यामुळे आरोपीने खटला मागे घ्यावा यासाठी सुरुवातीला धमक्या दिल्या. याबाबत संतोषने पोलिसात तक्रारही केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी बाळू घडसिंग याने संतोषवर धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.