scorecardresearch

विनायक परब

गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.

when did religion start
विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे? प्रीमियम स्टोरी

एका बाजूस शिकार करून गुजराण करत असतानाच जगातील पहिला धर्म अस्तित्वात आला, असे नवे गृहितक पुढे आले आहे, त्या संबंधातील…

electric bike fire
विश्लेषण : विजेवर चालणाऱ्या वाहनांना आग; चौकशीत नेमके काय लक्षात आले? प्रीमियम स्टोरी

ओला, ओकिनावा, प्युअर इव्ही, बूम मोटार आणि जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेइकल्स या कंपन्यांच्या एकूण नऊ गाड्यांना आग लागल्याच्या घटना वर्षभरात घडल्या.

udaigiri warship launch
विश्लेषण : भारतीय नौदलात आणखी दोन युद्धनौका… काय आहेत उदयगिरी आणि सुरतची वैशिष्ट्ये?

मंगळवारी जलावतरण करण्यात आलेल्या उदयगिरी या स्टेल्थ फ्रिगेट तर सुरत या स्टेल्थ विनाशिकेची निर्मिती या अद्ययावत पद्धतीने करण्यात आली आहे.

How exactly were smart cities five thousand years ago Answer found in Rakhigadhi
विश्लेषण : पाच हजार वर्षांपूर्वीची स्मार्ट शहरे नक्की होती तरी कशी? राखीगढीत मिळाले उत्तर…! प्रीमियम स्टोरी

हडप्पा, मोहेंजो-दारो आदी सिंधु संस्कृतीतील शहरे ही तत्कालीनच काय पण आजच्या परिप्रेक्ष्यामध्येही स्मार्ट शहरेच ठरतात.

विश्लेषण : पाणबुडी प्रकल्प अनिश्चिततेच्या भोवऱ्यात? नेमके काय घडले?

नेवल ग्रुप या फ्रेंच कंपनीने भारतात अद्ययावत पाणबुड्यांच्या निर्मिती प्रकल्पात सहभागी होण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे.

Water bottle
विश्लेषण : पॅकबंद पाणी पिण्यायोग्य असते का? प्रीमियम स्टोरी

खरे तर हे पॅकबंद पाणी ब्रॅण्डेड असल्याने विश्वासार्ह असायला हवे. प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही. या पॅकबंद पाण्याच्या दर्जाबाबतच्या अनेक…

al aqsa mosque israel palestine conflict
विश्लेषण : इस्राइल-पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाचे कारण ठरलेली अल-अक्सा मशीद आहे तरी काय?

पूर्व जेरुसलेममध्ये असलेले हे ठिकाण एकेश्वरवादी असलेल्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.

pakistan-flag
खेळपट्टीवर कितपत टिकणार?

पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे  हे त्याचे एक महत्त्वाचे कारण.

russia-putin
निर्रशियाकरण

रशिया-युक्रेन युद्धामध्ये त्यात सहभागी देशांमध्ये समावेश नसलेल्या, मात्र युद्धाची झळ मोठय़ा प्रमाणावर सहन कराव्या लागणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रक्रमावर असणार आहे.

missile-india-pakistan
भरकटलेले…

९ मार्च रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अचानक एक क्षेपणास्त्र भारतातून अपघाताने डागले गेले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या