scorecardresearch

Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- …पण गणेशोत्सवात ‘त्या’आदिवासी महिलांचा विचार कोण करणार?

Excerpt: Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- जव्हार, पालघर, बोइसर पासून ते अगदी कर्जत- कसाऱ्या पासून विविध गावांतून आदिवासी महिला फुले आणि गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचे हारे घेऊन मुंबईत दादरच्या फूलबाजारामध्ये येतात. त्यांचा तिथला अनुभव वेदनादायी असतो. अर्थशास्त्र त्यांना फारसे कळत नाही आणि सहज फसगत होते. ती फसगत रोखणे शक्य आहे का?

Ganesh Chaturthi 2023 Dadar Flower Market
गणेश चतुर्थी २०२३, गणपतीच्या खरेदीसाठी फुललेली बाजारपेठ

Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- गणपतीच्या खरेदीची लगबग सुरू होती, खासकरून फुलांच्या खरेदीची. गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या फुला- फळांचे आणि पत्रींचे हारे डोक्यावर घेऊन पालघर- बोईसर आणि कर्जत- कसारा परिसरातून अनेक आदिवासी महिला दादरच्या फुल बाजारामध्ये येत होत्या. खरेतर एरवीही हा बाजार तसा भरलेलाच असतो. पण गणपती, दसरा आणि दिवाळीच्या आधी एक दिवस आणि त्या कालखंडात पालघर- जव्हार आदी भागांतून आलेल्या आदिवासी महिलांची संख्या नेहमीच लक्षणीय असते. तशी ती यंदाही होती…

आणखी वाचा: History, Culture and significance of Ganesh: ‘महाविनायक’ गणरायाचे ‘अफगाणिस्तान कनेक्शन’ काय आहे?

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

एक महत्त्वाची बाब नेहमीच लक्षात येते ती म्हणजे नेहमी या काटक असलेल्या महिलाच त्यांच्या वजनापेक्षा कैक पटींनी अधिक वजनाचे हारे घेऊन या बाजारात येतात. पुरुष मंडळी अभावानेच नजरेस पडतात. आदिवासींमध्येही बहुधा महिलांनीच कष्टाची कामे करण्याची परंपरा असावी… असो, तर या महिला बाजारात आल्या होत्या. एका कडेला जागा मिळेल तिथे त्या बसत होत्या. मधूनच पालिकेची मंडळी आणि पोलीस यायचे आणि त्यांना बाजूला हटवून जायचे. त्यातीलच काही उस्ताद आपल्या घरच्या गणपतीसाठी त्यांच्याकडून फुले गोळा करत होते तर काही जण पैसे! …अर्थात त्यांना त्या जागी बसू देण्याची ही बिदागी.

आणखी वाचा: वैनायकी – गणपतीची शक्ती

या बायका मिळेल तिथे जागा पकडून बसत होत्या. या बाजारातील नेहमीच्या बायकांची मग त्यांच्या अंगावर ओरडाओरडी सुरू होती. त्यातील काही नेहमीच्या महिला या आदिवासी बायकांकडे येऊन त्यांच्याकडच्या मालाचा सौदा करत होत्या. माझ्या समोरच त्याच बाजारातील एका नेहमीच्या बाईने ३० रुपयांच्या ऐवजी त्या आदिवासी महिलेकडून २० रुपयांत मालकांगणी खरेदी केली आणि तीन- चार बायका सोडून सुरू असलेल्या तिच्या जागेवर उभ्या असलेल्या ‘त्या’ गिऱ्हाईकाला तीच मालकांगणी ५० रुपयांना विकली. ती आदिवासी बाई बिच्चारी सकाळी निघून सायंकाळी त्या बाजारात आली होती. रात्रभर तिथेच थांबणार होती, उद्या गणपतीच्या आदल्या दिवस त्या दिवशी नक्की चांगले पैसे मिळणार, अशी तिला अपेक्षा असणार. तोपर्यंत तिला किती जणांना असे हप्ते द्यावे लागणार, त्याचीही कल्पना नाही. ते सर्व कष्ट उपसून तिला काय मिळणार?

आणखी वाचा: चांगुलपणाला कुठं नाव असतं?

दुसरी एक आदिवासी आजी आपल्या नातीला घेऊन बाजारात आली होती. एक महिला पोलीस त्यांच्याकडून हप्ता गोळा करत असताना ती आजी नातीला म्हणाली. बघ, मी सांगत होते ना. धंदा लावताना पोलिसांसाठी पैसे वेगळे काढून ठेवायचे… काय शिक्षण आहे त्या नातीला मिळालेले? सो, अगदीच प्रॅक्टिकल. अनेक प्रश्न मनात आले आणि स्वतःच्याच अगतिकतेची लाजही वाटली.

या आदिवासींसाठी एखादी स्वयंसेवी संस्था काम नाही का करू शकत; त्यांनी जंगलातून आणलेल्या या वस्तूंचे नेमके मोल त्यांना मिळवून देण्यासाठी ? त्यासाठी एकत्रित प्रयत्न करता येणे शक्य आहे का ? कुणी करणार का त्यांच्यासाठी प्रयत्न ?
त्याचवेळेस वन खात्यातील मित्र असलेल्या अनेक अधिकाऱ्यांची आठवणही आली. आदिवासींकडून होणाऱ्या अनधिकृत जंगलतोडीबाबत ही मंडळी नेहमी बोलत असतात. प्रश्न मनात आला की, आपल्याला दर गणपतीमध्ये, दसऱ्याला आणि दिवाळीमध्ये लागणाऱ्या या सर्व बाबींची व्यवस्थित लागवड करता आली (या सर्व जंगली वनस्पती आणि वेली आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे पण तरीही ) आणि त्यांचा योग्य तो मोबदला आदिवासींना मिळवून देता आला तर ? एखादी एनजीओ करू शकते का हे काम ?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: While purchasing or preparing for ganesh chaturthi festival celebration whos going to think of adivasi women vp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×