scorecardresearch

Premium

Hero ची उडाली झोप, होंडाची नवी बाईक देशात दाखल, फीचर्स पाहून व्हाल थक्क, किंमत…

होंडाचा मोठा धमाका, देशात दाखल केली नवी बाईक

2023 Honda Hornet 2.0 launched
होंडाची नवी बाईक देशात दाखल (फोटो : financialexpress)

दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने आपली अद्ययावत Hornet 2.0 बाईक सादर केली आहे. ही दुचाकी नवीन BS6 फेज-II आणि OBD2 उत्सर्जन मानकांनुसार अपग्रेड केलेल्या इंजिनसह लाँच करण्यात आली आहे.

सिंगल-चॅनल ABS ने सुसज्ज नवीन बाईक

२०२३ हॉर्नेट २.० ला नवीन ग्राफिक्स आणि मोठ्या इंधन टाकीसह आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे.
तसेच, ऑल-एलईडी लाइटिंग, स्प्लिट सीट, लहान मफलर आणि १०-स्पोक अलॉय व्हील डिझाइनसह अॅल्युमिनियमचे तयार फूटपेग्स स्पोर्टी लुक वाढवतात.

amruta khanvilkar enters bb house and supports ankita lokhande
अंकिता लोखंडेसाठी ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली अमृता खानविलकर! लाडक्या मैत्रिणीला पाहून अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल
Upcoming 7Seater Cars
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय स्वस्त मिनी MPV कार; हे ऐकूनच बाकी कंपन्यांची उडाली झोप!
friendship will never end an old man keep friendship video viral of farmers home friendship in old age
Video : ही दोस्ती तुटायची नाय! म्हातारपणातही आजोबा जपताहेत मैत्री, शेतकरी राजाच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
singer sippy gill accident
लोकप्रिय गायकाचा विदेशात अपघात, भररस्त्यात उलटली वेगाने जाणारी कार, व्हिडीओ व्हायरल

सेगमेंट-फर्स्ट फीचर म्हणून, नवीनतम बाईकला गोल्डन अप-साइड डाउन (USD) फ्रंट फोर्क मिळतो.
यात सिंगल-चॅनल ABS सोबत ड्युअल-पेटल डिस्क ब्रेक्स फ्रंट आणि रियर, इंजिन-स्टॉप स्विच, हॅझर्ड लाइट्स, साइड स्टँड इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

(हे ही वाचा : Hyundai Creta टिकणार नाय? तब्बल ३२ सेफ्टी असलेली सर्वात सुरक्षित अन् स्वस्त कार देशात दाखल, किंमत… )

नवीन Hornet 2.0 बाईकमध्ये इंजिन अपडेट करण्यात आले आहे. 2023 Honda Hornet 2.0 मध्ये PGM-FI, १८४.४०cc, ४ स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे १२.७०kW पॉवर आणि १५.९Nm पीक टॉर्क निर्माण करते. नवीनतम बाईकची पिकअप आणि चालविण्याची क्षमता सुधारण्यासाठी एक्झॉस्टमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

किंमत

ही बाईक १.३९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत सादर करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2023 honda hornet 2 0 launched in india and is available in a single variant and four colour options pdb

First published on: 28-08-2023 at 18:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×