ह्युंदाई मोटर्स ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स बाजारात लॉन्च करत असते.सध्या भारतात एसयूव्हीचे मार्केट मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक कंपन्या आपल्या अत्याधुनिक फीचर्स असलेल्या एसयूव्ही भारतीय बाजरपेठेत लॉन्च करत आहेत. सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार्स लॉन्च झाल्या आहेत. त्यामुळे भारतात कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यातच ह्युंदाई कंपनीने नवीन फीचर्स आणि नवीन स्पेसिफिकेशन्ससह आपली Venue मॉडेल अपडेट केली आहे. नवीन अपडेटनुसार २०२३ व्हेन्यू हे मॉडेल अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ऑफर करणारी त्याच्या सेगमेंटमधील पहिली पहिली SUV बनली आहे.

2023 ह्युंदाई Venue : ADAS सिस्टिम

ह्युंदाईने व्हेन्यूमध्ये १.० लिटरचे टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटरचे दिसेल इंजिनसह टॉप स्पेक SX(O) ट्रिममध्ये ADAS फिचर सादर केले आहे. तर व्हेन्यू N लाइनवर ADAS ला टॉप स्पेक N8 ट्रीममध्ये ऑफर करण्यात येत आहे. Ioniq 5, Tucson आणि Verna नंतर ADAS फिचर दिले जाणारे व्हेन्यू हे कंपनीच्या लाइनपमधील चौथे मॉडेल आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Pune Metro, ruby hall, ramwadi Extended Route, Surge in Ridership, Revenue, yerwada metro station, pune citizen in metro, maha metro, marathi news, metro news,
पुणे मेट्रो सुसाट! प्रवासी संख्ये सोबतच उत्पन्नातही मोठी वाढ
indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 5 September: सर्वसामान्यांना आज मिळणार का दिलासा? पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

ADAS फीचरमुळे ह्युंदाई व्हेन्यू आता रस्त्यावर होणाऱ्या दुर्घटनांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असणार आहे.यामुळे सुरक्षित प्रवास होण्यास मदत होणार आहे. ADAS फीचरमुळे नवीन ह्युंदाई व्हेन्यूमध्ये लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग, लेन फॉलोविंग असिस्ट, हाय बीम असिस्ट, लिडिंग व्हेईकल डिपार्चर अलर्ट यांसारखे अनेक सॅफ्ट फीचर्स खरेदीदारांना मिळतात. तथापि, ह्युंदाई व्हेन्यूमध्ये अजूनही ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक आणि अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स मिळत नाहीत. ज्यामुळे या सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये समावेश असलेल्या स्मार्टसेन्स ADAS फिचरची लेव्हल ही १ आहे असे हे कळून येते.

२०२३ व्हेन्यू सेगमेंटमध्ये `दुसरे मोठे अपडेट मिळते ते म्हणजे यामध्ये १.० लिटरचे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनमध्ये पारंपरिक ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनश जोडले आहे. ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ट्रान्समिशन अलीकडेच लॉन्च झालेल्या व्हेन्यू नाइट एडिशनमध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिनसह परत आले आहे. ह्युंदाई २०२३ व्हेन्यूमधील १.० लिटरचे GDI टर्बो पेट्रोल इंजिन ११८ बीएचपी पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ७-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले आहे. व्हेन्यू लाइनअपमधील इतर इंजिन पर्यायांमध्ये १.२ लिटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर आणि १.५ लिटरचे डिझेल मिल यांचा समावेश आहे.

हेही वाचा : ह्युंदाई-किआचे धाबे दणाणले; होंडाची नवी SUV भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

किती असणार किंमत ?

ह्युंदाईने २०२३ अपडेटेड व्हेन्यू लॉन्च केली आहे. यात कंपनीने ADAS हे फिचर दिले आहे. या मॉडेलच्या किंमती १०. ३३ लाखांपासून सुरु होतात आणि १३.९० लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) पर्यंत जातात. कोरिअन कार निर्माती कंपनी असणाऱ्या ह्युंदाई कंपनीने SX(O) व्हेरिएंटसह ADAS फिचर जोडले आहे. ज्याची एक्स शोरूम किंमत १२.४४ लाखांपासून सुरु होते.