आपल्या Vespa स्कूटरसाठी लोकप्रिय असलेली एलएमएल (लोहिया मशिनरी लिमिटेड) कंपनी भारतात २९ सप्टेंबर २०२२ रोजी तीन इलेक्ट्रिक दुचाकी सादर करणार आहे. मात्र, सादरीकरणापूर्वीच एलएमएलच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो लीक झाला आहे. या स्कूटरचे नाव ‘एलएमएल स्टार’ असून त्याचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. फोटोमध्ये त्याचे डिझाइन, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

एलएमएल कंपनी एकाच वेळी तीन उत्पादन सादर करणार आहे. यामध्ये हायपरबाईक, एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक परफॉर्मन्स बाईकचा समावेश असेल. भारतीय बाजारपेठेत, एलएमएल स्टार टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक, एथर, ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्युअर ईव्ही, हिरो इलेक्ट्रिक सारख्या कंपन्यांच्या अनेक मॉडेल्सशी स्पर्धा करू शकते, अशी माहिती आहे.

आणखी वाचा : जबरदस्त फीचर्ससह लवकरच येणार Renault ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या काय आहे खास…

एलएमएल स्टारचे वैशिष्ट्ये

  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि इतर अनेक फीचर्स या स्कूटरमध्ये आहेत. यात एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, एलईडी डीआरएल आणि एलईडी टर्न इंडिकेटर मिळतील.
  • या स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ज्यामध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.
  • या स्कूटरवर ७-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील दिसत आहे.
  • ससस्पेन्शन सिस्टीममध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन सिस्टीम देण्यात येऊ शकते.