बंगळुरू आधारित इलेक्ट्रिक टू-व्हीलर वाहन निर्माता एथर (Ather) कंपनीने त्यांच्या आगामी कौटुंबिक स्कूटरला ‘डिझेल’ असे नाव दिलं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तर हे पाहता एथर एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनी एक्स (ट्विटर) वरून एक व्हिडीओ शेअर केला आणि सोनोग्राफी अल्ट्रासाऊंड मॉनिटरवर त्यांच्या कौटुंबिक ई-स्कूटरची एक झलक दाखवली. तसेच सहा महिन्यांत म्हणजेच या वर्षाच्या शेवटी ही ई-स्कूटर लॉंच केली जाईल असे सांगितले. या आगामी ई-स्कूटरचे नाव ‘एथर रिझता’ (Ather Rizta) असे ठेवण्यात आले आहे, असे तरुण मेहता यांनी या व्हिडीओतून सांगितले आहे.

आगामी ई-स्कूटर डिझेल प्रकल्पांतर्गत विकसित केली जात आहे. तरुण मेहता यांनी सोशल मीडिया पोस्टसह त्याचा एक छोटा टीझर व्हिडीओ दाखवला आणि कॅप्शनमध्ये माहिती दिली की, बंगळुरू आधारित इव्ही ब्रँड एथर रिझता तुमच्या कुटुंबासाठी एक आरामदायक आणि सुरक्षिततेसाठी एक खास ई-स्कूटर असेल. तसेच कंपनी या प्रोजेक्टवर २०१९ पासून काम करते आहे. ही ई-स्कूटर राइडचा अनुभव अधिक चांगला करेल. एथर कम्युनिटी डे सेलिब्रेशन २०२४(Ather Community Day Celebration 2024) या खास दिवशी याचे अनावरण होईल. सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनी शेअर केलेला टिझर एकदा तुम्हीसुद्धा बघा.

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate first gudi padwa celebrated with family in alibag
मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने पहिला गुढीपाडवा ‘या’ ठिकाणी केला साजरा, फोटो शेअर करत गायिका म्हणाली…
Mazhi Tuzhi Reshimgaath fame Myra Vaikul gives good news, soon she will be a big sister
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ लवकरच होणार मोठी ताई, स्वतःच दिली आनंदाची बातमी
मुग्धा वैशंपायनचा पहिला गुढीपाडवा, तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छा देत विचारलं, “प्रथमेशकडून काय गिफ्ट मिळालं?”

हेही वाचा…ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी MoveOS 4 सॉफ्टवेअरची घोषणा! १०० हून अधिक असणार फीचर्स; फायदे पाहा

टिझर पाहिल्यानंतर ई-स्कूटरच्या लॉंचची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या सेगमेंटमध्ये कौटुंबिक ई-स्कूटर शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी ही बेस्ट ठरेल. तसेच, स्कूटर सध्याच्या एथर ४५०एसपेक्षा खूप वेगळी असणार आहे, कारण यामध्ये दोन बॅटरी पॅक, ७.० इंच डीपव्ह्यू एलसीडी इन्स्ट्रुमेंटेशनदेखील देण्यात येणार आहे; जो ग्राहकांना रायडिंगचा उत्तम अनुभव देईल