जास्त पॉवर असलेल्या बाईकला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणूनच या सेगमेंटमध्ये अनेक बाईक बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध होत असतात. बजाज ऑटो दरवर्षी भारतात लाखो मोटारसायकली विकते आणि यापैकी पल्सर सीरिजच्या बाईक सर्वाधिक विकल्या जातात. १२५ सीसी, १५० सीसी, १६० सीसी, २०० सीसी, २२० सीसी किंवा २५० सीसी असो, या सेगमेंटमध्ये तुम्हाला पल्सर सीरिजच्या वेगवेगळ्या मोटारसायकली मिळतील. आता जे स्वत:साठी बजाज पल्सर बाईक खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

बजाज ऑटो आपली नवीन Pulsar N125 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे नवीन मॉडेल चाचणी दरम्यान स्पॉट केले गेले आहे आणि त्याच्या डिझाइनबद्दल काही माहिती देखील समोर आली आहे. तुम्हीही या बाईकची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Hero Motocorp Bike
Raider आणि Pulsar ची उडाली झोप, नवीन १२५cc बाईकने देशात दाखल होताच बाजारात उडविली खळबळ
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

(हे ही वाचा : मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?)

डिझाइन कसे असेल?

नवीन Pulsar N125 या बाईकचे डिझाईन स्पोर्टी असेल. इंधन टाकी आणि प्लॅस्टिकचे भाग देखील सध्याच्या Pulsar N150 प्रमाणेच असतील. याशिवाय बाईकमध्ये फुल डिजिटल स्पीडोमीटरही उपलब्ध असेल. बाईकमध्ये स्प्लिट सीट नसेल. उत्तम ब्रेकिंगसाठी यात सिंगल चॅनल एबीएस आणि डिस्क ब्रेकची सुविधा असेल. बाईकमध्ये मोनोशॉक सस्पेंशन असेल. रायडरच्या सोयीसाठी यात यूएसबी चार्जिंग पोर्टची सुविधाही असेल, अशी माहिती आहे.

नवी बाईक कधी लाँच होणार?

रिपोर्ट्सनुसार, बजाज ऑटो या वर्षी जूनमध्ये नवीन Pulsar N125 लाँच करू शकते आणि या नव्या बाईकची किंमत १ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. मात्र, या नवीन मॉडेलबाबत बजाज ऑटोकडून कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. भारतात या बाईकची थेट स्पर्धा TVS Raider 125 आणि Hero Xtreme 125R यांच्यात आहे. याशिवाय बजाज ऑटो पल्सर N250 आणि F250 चे अपडेटेड व्हर्जन लाँच करू शकते, अशी माहिती आहे.