scorecardresearch

Bajaj Avenger Street 160 vs Suzuki Intruder: स्टाईल, मायलेज आणि किमतीत कोणती क्रुझर बाइक वरचढ? जाणून घ्या

जर तुम्ही कमी बजेटमध्ये क्रूझर बाइक शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती, किंमत येथे जाणून घेता येईल.

Bajaj-Avenger-Street-160-vs-Suzuki-Intruder-2
Bajaj Avenger Street 160 vs Suzuki Intruder: स्टाईल, मायलेज आणि किमतीत कोणती क्रुझर बाइक वरचढ? जाणून घ्या (फोटो-BAJAJ, SUZUKI)

दुचाकी क्षेत्रातील क्रूझर बाइक विभागात आकर्षक डिझाईन्ससह प्रीमियम बाइक्स आहेत. या बाइकला पसंती असूनही किमतीमुळे लोकं विकत घेत नाहीत.जर तुम्ही कमी बजेटमध्ये क्रूझर बाइक शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती, किंमत येथे जाणून घेता येईल. आज, तुलनेसाठी बजाज अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट १६० आणि सुझुकी इंट्रूडर आहेत, तुम्हाला या दोन्ही गाड्यांचे संपूर्ण तपशील दिले असून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडू शकाल

Bajaj Avenger Street 160: बजाज अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट १६० ही या विभागातील सर्वात कमी किमतीची क्रूझर बाइक आहे. ही गाडी स्टायलिश डिझाइनसाठी पसंत केली जाते. बाइकमध्ये १६० सीसीचा सिंगल सिलिंडर देण्यात आला आहे. हे इंजिन १५ पीएस पॉवर आणि १३.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. तसेच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही क्रूझर बाईक ४७.२ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे.बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट १६० कंपनीने १,०८,९०२ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह लाँच केली असून सर्व कर भरून १,२९,२८३ रुपयांपर्यंत जाते.

Suzuki Gixxer Vs Yamaha FZS: स्टाईल, स्पीड आणि किमतीत सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

Suzuki Intruder: सुझुकी इंट्रूडर ही या विभागातील दुसरी सर्वात कमी किमतीची क्रूझर बाइक आहे. गाडी प्रीमियम डिझाइनमुळे पसंत केली जाते. कंपनीने त्याचा फक्त एकच प्रकार बाजारात आणला आहे. बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात १५५ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १३.६ पीएस पॉवर आणि १३.८ एनएण पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, बाईकच्या पुढच्या आणि मागील चाकामध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबतच सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिमही देण्यात आली आहे. बाइकच्या मायलेजबद्दल सुझुकीचा दावा आहे की ही क्रूझर बाईक ४५ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. या बाईकची सुरुवातीची किंमत १,२७,९०० रुपये असून ऑन रोड १,५२,९६४ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-04-2022 at 13:28 IST
ताज्या बातम्या