टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये चांगला मायलेज असलेल्या बाइक्सची मोठी मागणी आहे. ज्यामध्ये बजाज, हिरो, सुझुकी आणि होंडा यांसारख्या कंपन्यांच्या बाइक्स आहेत. यात कमी बजेट आणि कमी वजानची बजाज CT100 बाईक लोकप्रिय आहे. मात्र ही बाईक तुम्ही शोरुममधून घेतली तर तुम्हाला ५३,६९६ रुपये खर्च करावे लागतील. पण जर तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल, तर आम्ही तुम्हाला ही बाईक अर्ध्या किमतीत खरेदी करण्याच्या प्लॅनची ​​संपूर्ण माहिती सांगणार आहोत, आजची ऑफर बजाज CT100 वर देण्यात आली आहे.

सेकंड हँड टू-व्हीलर खरेदी करणाऱ्या वेबसाइट BIKES24 ने बजाज CT100 लिस्ट केली आहे. त्याच्या साईटवर त्याची किंमत फक्त ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बाईकचं मॉडेल २०१५ चं आहे आणि आतापर्यंत ७२,०१८ किमी धावली आहे. या बजाज CT 100 बाईक फर्स्ट युजर असून तिची नोंदणी दिल्लीतील DL 05 RTO कार्यालयात झाली आहे. कंपनी या बजाज CT100 बाइकच्या खरेदीवर काही अटींसह 1 वर्षाची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, ही CT 100 बाईक खरेदी केल्यापासून सात दिवसांच्या आत तुम्हाला ही बाईक आवडली नाही, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता, त्यानंतर कंपनी तुमचे पूर्ण पेमेंट तुम्हाला कोणत्याही कपातीशिवाय परत करेल.

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Hyundai Creta facelift
६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

टाटा मोटर्सच्या कमर्शिअल वाहनांच्या किंमती १ जानेवारीपासून वाढणार; जाणून घ्या

बजाज सीटी 100 वर उपलब्ध ऑफर जाणून घेतल्यानंतर बाईकचे मायलेज वैशिष्ट्य जाणून घेऊयात. बजाज CT100 मध्ये, कंपनीने १०२ सीसी इंजिन दिले आहे जे ७.९ पीएस पॉवर आणि ८.३४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्ससह दिले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, बाईकच्या पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे, बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बजाज सीटी 100 बाईक ८९.५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.