Best Selling SUV: फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच मार्चमध्येही मारुती सुझुकी ब्रेझा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. यामध्ये Tata Nexon आणि Hyundai Creta सारख्या SUV ला विक्रीच्या बाबतीत बाजी मारली आहे. मारुती सुझुकी ब्रेझा ही सलग दोन महिन्यांपासून सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. जर आपण मार्चमध्ये विकल्या गेलेल्या टॉप ५ SUV बद्दल बोललो तर या यादीत मारुती ब्रेझा पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Tata Nexon, तिसऱ्या क्रमांकावर Hyundai Creta, चौथ्या क्रमांकावर Tata Panch आणि पाचव्या क्रमांकावर Maruti Grand Vitara आहे.

मार्च २०२३ मध्ये ‘या’ कार ठरल्या सुपरहिट

1. Maruti Brezza ने मारली बाजी

मार्चमध्ये मारुती ब्रेझाने पुन्हा एकदा बेस्ट सेलिंग एसयूव्हीचा किताब पटकावला आहे. मार्च २०२३ मध्ये ब्रेझाच्या १६,२२७ युनिट्सची विक्री झाली होती, तर मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये १५,७८७ युनिट्सची विक्री झाली होती. मारुती ब्रेझाची किंमत ८.२७ लाख ते १४.१३ लाख रुपये आहे.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच

(हे ही वाचा : Tata Nexon ने ५ लाख यूनिट्स प्रोडक्शनचा गाठला टप्पा, ‘या’ कारणामुळे होतेय जबरदस्त विक्री )

2. Tata Nexon  दुसऱ्या क्रमांकावर 

Tata Nexon SUV या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, मार्च २०२३ मध्ये एकूण १४,७६९ युनिट्स विकल्या गेल्या, तर फेब्रुवारीमध्ये १४,५१८ युनिट्स विकल्या गेल्या. एकूण कार विक्रीच्या बाबतीत टाटा नेक्सॉन पाचव्या स्थानावर आहे.

3. Hyundai Creta तिसऱ्या स्थानावर

मागील महिन्यात (म्हणजे फेब्रुवारी २०२३) १२,८६६ युनिट्सच्या तुलनेत १४,०२६ युनिट्सच्या एकूण विक्रीसह Hyundai Creta मार्च २०२३ मध्ये तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.

(हे ही वाचा : Toyota Fortuner, MG Gloster चे धाबे दणाणले, जीप मेरिडियनचे दोन नवीन स्पेशल एडिशन देशात दाखल, किंमत…)

4. Tata Punch चौथ्या स्थानावर

मार्च २०२३ मध्ये एकूण १०,८९४ युनिट्स विकल्या गेलेल्या, तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ९,५९२ युनिट्स विकल्या गेलेल्या मायक्रो SUV यादीमध्ये ते चौथ्या स्थानावर आहे. एकूण कार विक्रीच्या बाबतीत ती नवव्या क्रमांकावर आहे.

5. Maruti Suzuki Grand Vitara पाचव्या स्थानावर

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कंपनीने प्रथमच देशातील १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत स्थान मिळवले आहे. मार्च २०२३ मध्ये एकूण १०,०४५ युनिट्सची विक्री झाली आहे. यासह, ती पाचवी सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली.