Best Selling Bike-Scooter: फेब्रुवारी महिन्यात बाईक आणि स्कूटरच्या विक्रीचे आकडे आपल्यासमोर आले आहेत. दुचाकींच्या विक्रीत १८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ८,२९,८१० युनिट्सची विक्री झाली, जे फेब्रुवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ७,०३,२२८ युनिट्सच्या तुलनेत १,२६,५८२ युनिट्सने वाढले. फेब्रुवारी २०२३ मध्ये, Hero च्या परवडणाऱ्या बाईकने २.८ लाख पेक्षा जास्त युनिट्स विकल्या, ज्यात सुमारे ५० टक्के वाढ झाली. या सिंगल बाईकने इतर सर्व बाईक्स आणि स्कूटर्सना मागे टाकले आणि देशातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक बनली.

फेब्रुवारीत ‘या’ बाईकची तुफान विक्री

१. Hero MotoCorp ची स्प्लेंडर ही पुन्हा एकदा देशात सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याची २,८८,६०५ युनिट्सची विक्री झाली आहे. तर एक वर्षापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये १,९३,७३१ युनिट्सची विक्री झाली होती. स्प्लेंडरने अशाप्रकारे सुमारे ४९ टक्क्यांनी झेप घेतली आहे. या बाईकची किंमत ७२ हजार रुपयांपासून सुरू होते.

२. Honda Activa स्कूटर दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, त्याची विक्री २०.०८ टक्क्यांनी वाढून १,७४,५०३ युनिट्सवर पोहोचली आहे. Honda लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे जी Activa स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हेरियंट असू शकते.

(हे ही वाचा : ग्राहकांची मजा! गुढीपाडव्याला २ लाखात घरी आणा मारुतीची देशातील बेस्ट सेलिंग कार, मायलेजमध्ये आहे ‘बाप’ )

३. बजाज पल्सर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची विक्री ४५.७८ टक्क्यांनी सुधारली आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये ८०,१०६ युनिट्सची विक्री झाली. Pulsar 220F पुन्हा लाँच केल्यानंतर, कंपनीने नवीन वैशिष्ट्यांसह त्याची Pulsar NS श्रेणी अपडेट केली आहे.

४. फेब्रुवारी २०२३ मध्ये, HF Deluxe ची विक्री २५.८६ टक्क्यांनी कमी होऊन ५६,२९० युनिट झाली. यादीत ते चौथ्या क्रमांकावर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. पाचव्या क्रमांकावर TVS ज्युपिटर स्कूटर आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, TVS ज्युपिटरची विक्री १४.४४ टक्क्यांनी वाढून ५३,८९१ युनिट झाली. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची ४७,०९२ युनिट्सची विक्री झाली.