सकाळी बातम्या बघताना किंवा वाचताना एखाद-दुसरी वाहन चोरीची बातमी आपल्या डोळ्यांना दिसत असते. त्यामध्ये ते वाहन खासकरून दुचाकी असण्याचे प्रमाण अधिक असते. ही चोरी अगदी भल्यामोठ्या शहरांपासून ते अगदी एखाद्या लहानश्या गावात रात्री किंवा अगदी दिवसाढवळ्या होत असतात. या गोष्टी टाळण्यासाठी दुचाकी बनवणारे उत्पादक त्यांच्या रक्षणासाठी काही फीचर्स गाडीमध्ये बसवत असले तरीही आपण आपल्याकडून अधिक काळजी घेतलेली केव्हाही चांगलेच असते.

चोरांनी चारचाकी वाहनांचे दार बिनाचावी उघडण्याचा प्रयत्न केल्यास, सुरक्षेसाठी त्यामध्ये एक विशिष्ट आवाज करणारा अलार्म बसवलेला असतो. तो वाजण्यास सुरुवात होऊन गाडीचा मालक सावध होतो. मात्र, तशी सुविधा दुचाकीमध्ये अजूनतरी पाहायला मिळत नाही. त्यासाठी आपण स्वतः त्यावर काय उपाय करू शकतो ते पाहू.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

हेही वाचा : Car tips : सेकंड हॅण्ड गाडी विकत घेताय? मग कायम लक्षात ठेवा या पाच टिप्स….

१. अँटी-थेफ्ट अलार्म इन्स्टॉल करणे

दुचाकी गाडीची चोरी होऊ नये, यासाठी त्यामध्ये अँटी-थेफ्ट अलार्म बसवून घ्यावा. हा अलार्म अगदी चारचाकी वाहनांमध्ये बसवलेल्या अलार्मप्रमाणेच काम करतो. त्यामुळे कोणत्याही तिऱ्हाईत व्यक्तीने तुमची गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केल्यास तो अलार्म वाजून वाहन मालकास सावधान करण्याचे काम करेल. मात्र, इतर वाहनांपेक्षा वेगळा आवाज करणारा अलार्म निवडावा. यामुळे तुम्हाला कुठूनही तुमच्या गाडीचा आवाज समजण्यास मदत होईल. अशा प्रकारचे अलार्म तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन कुठूनही खरेदी करू शकता.

२. किल स्विच इन्स्टॉल करणे [Kill switch]

अनेक दुचाकी वाहनांमध्ये किल स्विच बसवण्यात आलेला असतो. या स्विचमुळे स्टार्ट प्लगमधील विजेचा पुरवठा बंद करून इंजिनपर्यंत पोहोचू देत नाही. परिणामी गाडी सुरू होऊ शकत नाही. तुम्ही स्वतः तो स्विच डिसेबल केल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही. अशी सुरक्षा अनेक दुचाकी वाहनांमध्ये बसवलेली असते. मात्र, तुमच्या गाडीत ही सुविधा किंवा किल स्विच बसवला नसल्यास तुम्ही तो बसवून घेऊ शकता. यामुळे गाडी चोरी होण्याची शक्यता कमी होते.

हेही वाचा : Car tips : दुर्गंधी, घाण वास दूर करतील कॉफीच्या बिया; पाहा सुगंधी गाडीसाठी ‘स्वस्तात मस्त’ अशा टिप्स….

३. वाहनाला लॉक लावून ठेवणे

अत्यंत सोपी आणि उपयुक्त अशी युक्ती म्हणजे विविध लॉक्सचा वापर करणे. यासाठी तुम्ही दोन किंवा त्याहून अधिक लॉक्सचा वापर करू शकता. हॅण्डल लॉक, इग्निशन लॉक, डिस्क ब्रेक लॉक आणि फोर्क लॉक यांसारख्या लॉकचा वापर केल्यास तुमचे वाहन अधिक सुरक्षित राहू शकते. या चार प्रकारच्या लॉक्सचा वापर केल्यास तुमची गाडी अजिबात हलू शकणार नाही, त्यामुळे आपोआपच तिचे चोरांपासून रक्षण होईल.

४. अवजड वस्तूला गाडी बांधून ठेवणे

एखाद्या मोठ्या आणि अवजड वस्तूला आपले दुचाकी वाहन बांधून ठेवावे. असे केल्याने वाहनांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल. गाडी एखाद्या जाड आणि मजबूत साखळीच्या आणि पॅडलॉकच्या मदतीने कशासतरी बांधून ठेवा.

अशा साध्या मात्र उपयुक्त टिप्सचा वापर करून स्वतःच्या मोटारसायकल, बाईकसारख्या दुचाकी वाहनांची काळजी घेता येऊ शकते, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.